Ravindra Jadeja Gifts His Bat: मोठ्या मनाचा जडेजा! ज्या बॅटने CSK ला मिळवून दिला विजय, तीच बॅट केली गिफ्ट

Ravindra Jadeja Match Winning Bat: या विजयानंतर रविंद्र जडेजाने मन जिंकणारं काम केलं आहे.
ravindra jadeja
ravindra jadeja saam tv
Published On

Ravindra Jadeja: आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारत पाचव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

चेन्नईचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा या सामन्याचा हिरो ठरला आहे. शेवटच्या २ चेंडूंवर १० धावांची गरज असताना, रविंद्र जडेजाने षटकार आणि चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर रविंद्र जडेजाने मन जिंकणारं काम केलं आहे.

ravindra jadeja
WTC 2023 Final: IPL ची ट्रॉफी हुकली म्हणून काय झालं? रोहितकडे विराटला मागे सोडत इतिहास रचण्याची संधी..

अंतिम षटकात चेन्नईचा विजय...

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला १५ षटकात १७१ धावांची गरज होती. १४ षटकांपर्यंत दोन्ही संघांना विजयाची समान संधी होती. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १३ धावांची गरज होती.

त्यावेळी गुजरातचा सर्वात यशस्वी गोलंदाज मोहित शर्मा गोलंदाजी करण्यासाठी आला होता. सुरुवातीचे ४ चेंडू अचूक टप्प्यावर टाकले होते.

या ४ चेंडूंमध्ये त्याने अवघ्या ३ धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुढच्या २ चेंडूंवर १० धावांची गरज होती. त्यावेळी रविंद्र जडेजाने षटकार आणि चौकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. (Latest sports updates)

भेट म्हणून दिली बॅट...

जडेजाने चौकार मारताच चेन्नईचे फॅन एकच जल्लोष करू लागले. संपुर्ण स्टेडिअममध्ये केवळ आणि केवळ चेन्नई सुपर किंग्जचा आवाज फिरत होता. संघातील खेळाडु ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष साजरा कताना दिसुन आले.

तर ड्रेसिंग रुममधील सदस्य अजय मोंडलला रविंद्र जडेजाने खास गिफ्ट दिलं आहे. अजय मोंडलला रविंद्र जडेजाकडुन बॅट गिफ्ट म्हणुन मिळाली आहे. अजयने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

अजयने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत जडेजाचे आभार देखील मानले आहेत. त्याने लिहिले की, 'जडेजाने ज्या बॅटने शेवटच्या २ चेंडूंवर १० धावा मारल्या. ती बॅट त्याने मला गिफ्ट म्हणून दिली आहे.' या पोस्टद्वारे त्याने रविंद्र जडेजाचे आणि चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायजीचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com