Daughter Kills mother Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मोठ्या बहिणीवर प्रेम आणि माझा तिरस्कार करते, रागाच्या भरात मुलीने आईलाच संपवले; घटनेने मुंबई हादरली

Daughter Kills mother Mumbai: आई फक्त मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते या रागातून मुलीनेच आपल्या वयस्कर आईची हत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे. कुर्ल्याच्या करेशीनगरमध्ये ही घटना घडली.

Priya More

मयूर राणे, मुंबई

मुंबईमध्ये मुलीनेच आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुर्ल्यातील कुरेशनगरमध्ये ही घटना घडली आहे. मोठ्या बहिणीवर प्रेम आणि माझा तिरस्कार करते म्हणून संतापलेल्या मुलीने आईलाच संपवले. मुलीने आपल्या आईवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला अटक केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्याच्या करेशीनगरमध्ये आई फक्त मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते या रागातून मुलीनेच आपल्या वयस्कर आईची हत्या केल्याची घटना घडली. सबिरा बानो आझगर शेख (६२ वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सबिरा बानो यांची मुलगी रेश्मा मुजफ्फर काजी (४१ वर्षे) हिने त्यांची हत्या केली. या घटनेमुळे कुर्ल्यामध्ये खळबळ उडाली आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या सबिरा बानो या मुंब्र्यामध्ये आपल्या मुलासोबत राहत होत्या. गुरूवारी रात्री त्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी कुर्ल्यातील कुरेशीनगरमध्ये आल्या होत्या. यावेळी आपली आई ही आपल्यापेक्षा आपल्या मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते आणि आपला तिरस्कार करते या भावनेतून रेश्मा आपल्या आईशी भांडू लागली.

भांडण इतके विकोपला गेले की संतापलेल्या रेश्माने आपल्या आईवर घरातील चाकूने वार केले. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सबिरा बानो यांचा जागीच मृत्यू झाला. आईची हत्या केल्यानंतर तिने थेट चुनाभट्टी पोलिस ठाणे गाठून आपण आपल्या आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस तपास करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

SCROLL FOR NEXT