Pune Crime: लघुशंका करताना हटकल्याचा राग, हवेत गोळीबार; टोळक्यानं मारहाणही केली, वॉचमनच्या बायकोचा मृत्यू

Pune Watchman Wife Death: लघुशंकेवरून झालेल्या वादानंतर तरुणांनी गोळीबार आणि दगडफेक करत वॉचमनसह त्याच्या बायकोला मारहाण केली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Pune Crime: लघुशंका करताना हटकल्याचा राग, हवेत गोळीबार; टोळक्यानं मारहाणही केली, वॉचमनच्या बायकोचा मृत्यू
Pune Crime News Saam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

उघड्यावर लघुशंका करताना हटकल्याने टोळक्याने संतप्त होत वॉचमनसह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करून हवेत गोळीबार केला. पुण्यातल्या थेऊरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शीतल चव्हाण (२९ वर्षे) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांना अटक केली असून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर भागात एका जमिनीचे प्लॉटिंग सुरू आहे. याठिकाणी अक्षय चव्हाण पत्नीसोबत रखवालदारीसाठी कार्यरत होते. शुक्रवारी रात्री एका कारमधून ३ जण उतरले आणि त्यांनी तिथे मोकळी जागा असल्यामुळे लघुशंका केली. त्यावेळी अक्षयने त्यांना हटकले. यातून त्या तिघांची आणि अक्षयमध्ये बाचाबाची झाली.

Pune Crime: लघुशंका करताना हटकल्याचा राग, हवेत गोळीबार; टोळक्यानं मारहाणही केली, वॉचमनच्या बायकोचा मृत्यू
Beed Crime: धक्कादायक! व्यवसायिक भागिदारांमध्ये पैशाचा वाद, पायाला कुलूप लावून ठेवलं डांबून

अक्षय आणि त्या तरुणांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर अजय मुंढेने त्याच्याजवळील पिस्तुलने हवेत गोळीबार केला आणि दगडफेक केली. या दगडफेकीत दगड लागल्याने अक्षयची पत्नी गंभीर जखमी झाली. जखमी झालेल्या अक्षयच्या पत्नीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Pune Crime: लघुशंका करताना हटकल्याचा राग, हवेत गोळीबार; टोळक्यानं मारहाणही केली, वॉचमनच्या बायकोचा मृत्यू
Mumbai Crime: शेजारच्यानं खेळण्याच्या बहाण्यानं घरी नेलं अन् केला लैगिंक अत्याचार, ३१ डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं?

या घटनेमुळे थेऊर परिसरामध्ये खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. सतीश लोखंडे, अजय मुंढे आणि भानुदास शेलार या तिघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी पिस्तुल, काडतुसे आणि कार जप्त केली.

Pune Crime: लघुशंका करताना हटकल्याचा राग, हवेत गोळीबार; टोळक्यानं मारहाणही केली, वॉचमनच्या बायकोचा मृत्यू
Sangli Crime News : चोरीच्या दुचाकी विक्री करत मौजमस्ती; विक्री करतानाच झाला भांडाफोड, १९ मोटारसायकली जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com