Mumbai Crime News 35-year-old woman physically assaulted by Bhondubaba in Bhayander Saam TV
मुंबई/पुणे

Bhayander News: कौटुंबिक बाधा दूर करण्याचा बहाणा, मांत्रिकाकडून ३५ वर्षीय विवाहितेवर अत्याचार; संतापजनक घटना

Bhayander Crime News: भाईंदरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अडीअडचणी दूर करण्याचं प्रलोभन दाखवून एका ४५ वर्षीय मांत्रिकाने ३५ वर्षीय विवाहितेवर बलात्कार केला.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारांचं प्रमाण वाढलं आहे. पीडितांकडून तक्रार दाखल होताच पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत आहेत. अशातच भाईंदरमधून (Bhayander News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अडीअडचणी दूर करण्याचं प्रलोभन दाखवून एका ४५ वर्षीय मांत्रिकाने ३५ वर्षीय विवाहितेवर बलात्कार केला.

याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी मांत्रिकाला सोमवारी बेड्या ठोकल्या. मुकेश दर्जी (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने पोलिसांत (Police) दिलेल्या फिर्यादीनुसार, मैत्रिणीच्या माध्यमातून तिची आरोपीशी ५ वर्षांपूर्वी ओळख झाली होती.

आरोपी हा काळी जादू करत असून सर्व समस्या दूर करतो, माझ्या सर्व समस्या दूर होऊन माझी भरभराट झाली आहे, त्यामुळे तुलाही तो मदत करेल असे सांगून मैत्रिणीने पीडितेची आरोपीशी ओळख करून दिली होती. पीडित विवाहितेचे पतीशी पटत नव्हते, तसेच तिचा लग्नाआधीचा प्रियकरही तिला त्रास देत असे.

त्यामुळे मैत्रिणीच्या सांगण्यावरून तिने आरोपी मुकेश दर्जी याच्याशी संपर्क साधला होता. दरम्यान, आरोपीने जादूच्या साह्याने तो तिच्या साऱ्या समस्या दूर करेल; मात्र त्यासाठी तिला त्याच्याशी शारीरिक संबंध (Crime News) ठेवावे लागतील असे पीडितेला सांगितले.

गेली तीन ते चार वर्षे आरोपी काळ्या जादूच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. अखेर महिलेने भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी मांत्रिकावर नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT