Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : मुंबईत शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 31 लाखाची फसवणूक, तिघांना अटक

Satish Kengar

>> संजय गडदे

Mumbai Crime News : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची ३१ लाख ७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. उत्तर मुंबई (Mumbai) सायबर पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

सायबर पोलिसांनी कल्याणसिंग करणसिंग चंदेल उर्फ ​​पियुष अग्रवाल (29) महोबा उत्तर प्रदेश आणि अनुज रामनारायण भगोरिया (30), भीमसिंग गोवर्धन मिना (28) यांना इंदूर मध्य प्रदेशातून अटक केली. आरोपींकडून 1 लॅपटॉप, 9 मोबाईल, 8 सिम कार्ड, 15 डेबिट कार्ड, 2 पासबुक आणि 1 चेकबुक जप्त करण्यात आले आहे.

एप्रिल २०२१ मध्ये AK फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी मधून महिलेला वारंवार फोन येत होते. AK फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून आपण जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. तर मोठ्या प्रमाणात रिटर्न्स मिळतील, असे आमिष महिलेला दाखविले गेले. महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी नोंदणी शुल्क ५००० ऐवजी अवघे तीन हजार सातशे रुपये घेतले. (Latest Marathi News)

सोने आणि कच्च्या तेलातील गुंतवणुकीवरील चांगला परतावा दाखवणारा स्क्रीनशॉट आरोपीने महिलेला पाठवला. त्यानंतर महिलेने गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली. गुंतवणुकीच्या नावावर महिलेने १६३ वेळा ट्रांजेक्शन केले. यात पाच हजारापासून साठ हजारापर्यंत ट्रांजेक्शन करण्यात आले.

अशाप्रकारे महिलेने मार्च २०२३ पर्यंत शेअर बाजारात ३१ लाख ७ हजारांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर आरोपीने महिलेला व्हॉट्सअॅपवर नफ्याच्या डेटाचा स्क्रीनशॉट पाठवला.यानंतर महिलेने नफ्याची रक्कम काढण्याबाबत विचारणा केली असता, आरोपीने बँक व्यवहारातील तोटा नफा व कर भरण्याच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी केली. मात्र तक्रारदार महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी महिलेच्या कुटुंबीयांना इजा करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या घरी रिकव्हरी एजंट पाठवले.

त्यानंतर महिलेने मार्च २०२३ मध्ये उत्तर मुंबई सायबर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी कल्याणसिंग करणसिंग चंदेल उर्फ ​​पियुष अग्रवाल (29) महोबा उत्तर प्रदेश आणि अनुज रामनारायण भगोरिया (30), भीमसिंग गोवर्धन मिना (28) यांना इंदूर मध्य प्रदेशातून अटक केली. आरोपींकडून 1 लॅपटॉप, 9 मोबाईल, 8 सिम कार्ड, 15 डेबिट कार्ड, 2 पासबुक आणि 1 चेकबुक जप्त करण्यात आले आहे.

या ठग टोळीत किती लोक सामील होते आणि आता शेअर बाजारात जास्त नफा मिळवून देण्याच्या नावाखाली किती लोकांची फसवणूक केली आहे, याचा तपास सायबर पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT