Navy Employee Found Dead In Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर नौदल कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य

Navy Employee Found Dead In Mumbai: मुंबईमध्ये नौदल कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने बायको आणि दोन मुलांची हत्या केली. या घनटेमुळे मुंबईत खळबळ उडाली.

Priya More
  • नौदल कर्मचाऱ्याने बायको आणि दोन मुलांची हत्या केली

  • मुंबई नेव्ही नगर परिसरात ही घटना घडली

  • नौदल कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली

  • चौघांच्या मृत्यूमुळे मुंबई हादरली

मुंबईमध्ये नौदल कर्मचाऱ्याने कुटुंबीयांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक समोर आली आहे. मुंबईतल्या कुलाबा येथील नेव्हीनगर परिसरात ही घटना घडली. नौदल कर्मचाऱ्याने आधी पत्नी आणि दोन मुलांना विष दिलं. त्यानंतर त्याने घरामध्येच गळफास घेत आयुष्य संपवलं. या हत्याकांड आणि आत्महत्या प्रकरणाने मुंबई हादरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नेव्ही नगर परिसरात एका घरातून एका चौघांचे मृतेदह आढळून आले. नौदल कर्मचाऱ्याने आपली बायको आणि दोन मुलांची हत्या केली. त्याने या तिघांना विष दिलं. त्यानंतर स्वत: देखील गळफास घेत आत्महत्या केली. या नौदल कर्मचाऱ्याच्या मुलांचे वय अंदाजे ३ वर्षे आणि २ महिने असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस सध्या या चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाबींची तपासणी करत आहेत. घटनास्थळी सध्या नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, नौदल कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. तर त्याची बायको आणि दोन मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.

नौदल अधिकारी पोलिसांच्या साथीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमागील हेतू आणि कुटुंबाने हे टोकाचे पाऊल का उचलले हे शोधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी स्पेनमधील एक कुटुंब मुंबईत आलं

Sugar Free Drink For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी 5 शुगर फ्रि ड्रिंक, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Ganesh Chaturthi 2027: पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणार, तारिख आत्ताच लिहून घ्या

7 Best Vegetables for Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी आवर्जून खाव्यात ‘या’ 7 भाज्या; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Vanita Kharat: वनिता खरातचा जबरदस्त फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन; तब्बल २४ किलो वजन केलं कमी

SCROLL FOR NEXT