Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: शिवी दिल्याने तरुणाची सटकली, मित्रालाच जिवानिशी मारलं

Andheri Crime News: अंधेरीमध्ये मित्राने मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शिवी दिल्याचा राग आल्यामुळे तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये किरकोळ वादातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अंधेरीमध्ये ही घटना घडली आहे. शिवी दिल्याचा राग आल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या मित्राची हत्या केली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील कोल डोंगरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. कोल डोंगरी सहार रोडवरील यशोधन सोसायटीच्या मोकळ्या जागेत सुजित सिंग (३९ वर्षे) आणि सुनील परशुराम कोकाटे (५२ वर्षे) हे गप्पा मारत बसले होते. गप्पा मारताना सुजितने सुनीलला शिवी दिली.

शिवीगाळ केल्यामुळे सुनील कोकाटेची सटकली. त्याने सुजितलाा मारहाण करत त्याच्यावर चाकूहल्ला केला. सुनीलने चाकूच्या सहाय्याने सुजितच्या छातीवर आणि हातावर वार केले. या हल्ल्यामध्ये सुजित गंभीर जखमी झाला. रक्तस्राव अधिक प्रमाणात झाल्यामुळे तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला.

मध्यरात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मयत सुजितच्या पत्नीच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिस ठाण्यात सुनीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 Gram Gold Mangalsutra : 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सुंदर मंगळसूत्र; ‘या’ 5 स्टायलिश डिझाईन्स पाहुन नवराही होईल खूश

Apple CEO Resign : Apple चे CEO टिम कुक यांचा राजीनामा! सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती; नवे सीईओ कोण? जाणून घ्या

Jeeryach Paani: जिऱ्याचं पाणी की अॅपल सायडर व्हिनेगर? वजन कमी करण्यासाठी सकाळी काय प्यावं?

Crime: बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने कृत्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली

तुम्ही खात असलेले मसाले, चहा पावडर सुरक्षित आहे का? एक्स्पायरी डेट बदलण्याचा काळाबाजार उघड

SCROLL FOR NEXT