Crime News : एकटीला गाठले, अश्लील व्हिडीओ बनवून धमक्या दिल्या; भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

Crime News in Rajasthan : एका तरुणाने अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची घटना राजस्थानच्या अलवरमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपीला स्थानिक पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

Crime News Update : एका तरुणाने घरात एकटीला गाठून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला फसवून, तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा गैरफायदा घेतला. आरोपी हा नात्याने पीडित मुलीचा भाऊ लागतो अशी माहिती समोर आली आहे. ही घटना राजस्थानच्या अलवरमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा पीडितेच्या वडिलांच्या दूरच्या नातेवाईकाचा भाचा आहे. नात्यात असल्याने आरोपी पीडितेच्या घरी नियमित वावर होता. तो काही-ना-काही काम काढून त्यांच्या घरी येत असे. पुढे आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले.

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी या प्रकरणाची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये केली. पोलिसांनीही परिस्थितीचे गांभीर्य जाणून लगेच एफआयआर दाखल केली. त्याचसोबत पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब देखील घेतला. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.

Crime News
कर्जाचा हप्ता घ्यायला आला, महिला प्रेमात पडली, नवऱ्याला सोडून त्याच्यासोबत चूल मांडली

आरोपी जयपूरमध्ये क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होता. तेव्हाच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तिचे अश्लील व्हिडीओदेखील बनवले. हे व्हिडीओ पोस्ट करेन अशी धमकी देऊन त्याचे अल्पवयीन मुलीवर अनेकदा शोषण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Crime News
Crime News: जीवघेणी रॅगिंग! ३ तरुणांच्या गुप्तांगाला लटकावले डम्बल, जखमा करून बाम चोळला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com