
केरळमधील एका सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये जीवघेण्या रॅगिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेडिकलच्या थर्ड इअरमध्ये शिकणाऱ्या ५ विद्यार्थ्यांनी ३ ज्युनिअर्सला क्रूरपणे शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या विद्यार्थ्याची रॅगिंग सुरू होती. या विद्यार्थ्यांनी रँगिग करत ज्युनिअरच्या प्रायव्हेट पार्टला डम्बल लटकवले. या घटनेमुळे खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना कोट्टायम येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये घडली. थर्ड इअरच्या ५ विद्यार्थ्यांनी मेडिकलच्या फस्ट इअरमध्ये शिकणाऱ्या ३ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केले. तिन्ही विद्यार्थी तिरुअनंतपुरमचे आहेत. विद्यार्थ्यांनी कोट्टायम गांधीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीत असे सांगण्यात आले की, पाचही विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून रॅगिंग सुरू केले होते. या पाचही जणांनी मिळून तीन महिने ३ विद्यार्थ्यांवर अत्याचार केले.
पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर पाचही विद्यार्थ्यांना कॉलेजमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात रॅगिंगविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थ्यांनी फस्ट इअरच्या विद्यार्थ्यांना नग्न उभे राहण्यास भाग पाडण्यात आले तर सिनिअर विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुप्तांगाला डंबल्स लटकावले. पीडितांना तीक्ष्ण वस्तूंनी देखील दुखापत केली गेली. ज्यामध्ये भूमिती बॉक्समधील कंपासचाही समावेश होता. यानंतर पीडित विद्यार्थ्यांच्या जखमांवर बाम लावण्यात आले. हे सिनिअर्स पीडित विद्यार्थ्यांना नेहमी रविवारी दारूसाठी पैसे मागायचे.
हे सिनिअर्स ऐवढ्यावर थांबले नाही तर रँगिग सुरू असताना पीडित विद्यार्थ्याने वेदनेने ओरडायला सुरुवात केल्यास त्याच्या तोंडात जबरदस्तीने बाम लावण्यात आले होते. याबाबत काहीही तक्रार केली तर परिणामांना सामोरे जावे लागेल अशा देखील धमक्या दिल्या जात होत्या. पीडित विद्यार्थी आपले शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून निमूटपणे हा त्रास सहन करत राहिले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोचीमध्ये एका १५ वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्याने रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. विद्यार्थ्याच्या आईने आरोप केला आहे की, तिच्या मुलाला क्रूरपणे रॅगिंग करण्यात आले होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.