Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण; सर्व आरोपी फासावर जावे, सुरेश धस यांची देवाकडे प्रार्थना

Suresh Dhas : आमदार सुरेश धस सध्या नाशिकमध्ये आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. यावर बोलताना धस यांनी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी प्रार्थना केल्याचे म्हटले आहे.
Santosh Deshmukh Case Suresh Dhas
Santosh Deshmukh Case Suresh DhasSaam Tv
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Santosh Deshmukh Case : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाले आहेत. या हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई झालेली नाही. याशिवाय आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे नक्की कोण आहे हे देखील स्पष्ट झालेले नाही. यावर बीडचे आमदार सुरेश धस यांनी भाष्य केले आहे. ते सध्या नाशिकमध्ये आहेत.

सुरेश धस यांनी नाशिकच्या कपालेश्वर मंदिराला भेट दिली. तेव्हा त्यांनी सर्व आरोपी फासावर जावे अशी प्रार्थना केली. ते म्हणाले, 'मी देवाकडे कधीच काही मागत नाही. कपालेश्वर मंदिरात मी स्वतःसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनता सुखी राहावी ही प्रार्थना केली. आमच्या बीड जिल्ह्यासारखे होऊ नये अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर चार्टशीट व्हावी. हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालावी. सगळे आरोपी फासावर जावे अशी प्रार्थना देवाच्या चरणी केली आहे.'

'संतोष देशमुख प्रकरणात धनजंय मुडे यांचा राजीनामा मी स्वत: मागितला नव्हता. त्यांच्याच पक्षातील लोक त्यांनी राजीनामा द्या म्हणत आहेत. ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनीही ही मागणी केली आहे. तपासामध्ये एसआयटी आकापर्यंत पोहोचली हे. आकाच्या पुढे गेल्यानंतर बघू' असेही आमदार सुरेश धस म्हणाले.

Santosh Deshmukh Case Suresh Dhas
Krushna Andhale : कृष्णा आंधळे अजूनही फरार, दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा

'धनजंय मुडे यांचा राजीनामा घ्यावा की नाही हा निर्णय अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी घ्यावा. पक्षप्रमुखांनी मनात आणले तर त्यांचा राजीमाना तातडीने घेतला जाईल. या प्रकरणामुळे त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होत आहे. त्यांचा पक्ष व्राँग बोक्समध्ये चालला आहे. आमचा पक्ष पॉझिटिव बॉक्समध्ये चालला आहे', असे वक्तव्य सुरेश धस यांनी नाशिकमध्ये केले.

Santosh Deshmukh Case Suresh Dhas
jalna News : मनोज जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई, जालन्यात प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com