Buldhana Crime: तरुणाचा ३ महिलांवर जीवघेणा हल्ला; एकीचा जागीच मृत्यू; बुलडाण्यात खळबळ

Buldhana Police: बुलडाण्यामध्ये जुन्या वादातून एका तरुणाने ३ महिलांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोघी जणी गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली.
Buldhana Crime: तरुणाचा ३ महिलांवर जीवघेणा हल्ला; एकीचा जागीच मृत्यू; बुलडाण्यात खळबळ
Buldhana crimeSaam tv
Published On

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने ३ महिलांवर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जुन्या वादातून या तरुणाने हा जीवघेणा हल्ला केला. जखमी महिलांवर अकोला येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढली असून दररोज हल्ल्यांच्या घटना समोर येत आहेत. मध्यरात्री खामगाव शहरातील शंकरनगर भागातील बोबडे कॉलनीत एका तरुणाने राडा केला. गोलू सारसर या तरुणाने घरा शेजारी राहणाऱ्या ३ महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. हा हल्ला इतका गंभीर होता की एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या.

Buldhana Crime: तरुणाचा ३ महिलांवर जीवघेणा हल्ला; एकीचा जागीच मृत्यू; बुलडाण्यात खळबळ
Crime News : मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह, सासऱ्यानेच केले जावयाचे अपहरण, पुढे काय घडलं? वाचा

गावकऱ्यांनी या दोन्ही महिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. दोन्ही जखमी महिलांवर अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात उपचार सुरू असून दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. महिलांवर हल्ला करून आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास आरोपीला अटक केली. यामुळे मात्र बुलडाणा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र समोर आलं आहे.

Buldhana Crime: तरुणाचा ३ महिलांवर जीवघेणा हल्ला; एकीचा जागीच मृत्यू; बुलडाण्यात खळबळ
Wardha Crime: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; इंस्टाग्रामवर ओळख केली नंतर दुचाकीवरून नेलं नातेवाईकाच्या घरी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com