GBS Cases in Pune : राज्यात 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'ची धास्ती वाढली; पुण्यात रुग्णांची शंभरी पार, कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण?

Guillain-Barré syndrome in Pune : राज्यात 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'ची धास्ती वाढल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'च्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयात 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'च्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Pune GBS Cases News
Pune GBS Cases NewsChatGPT
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : राज्यात 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'चं थैमान वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातही 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'चं रुग्ण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात या आजाराचे रुग्ण शंभरी पार गेले आहेत. या आजारामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आता आजाराचे ४ नवीन रुग्ण हे कमला नेहरु रुग्णालयात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. 'जीबीएस' रुग्णांनी पुण्यात शंभरी पार केले आहे.

पुण्यातील कमला नेहरु रुग्णालयात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे ४ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. पुण्यातील रुग्णासाठी जीबीएस आजाराचे इंजेक्शन कमला नेहरु रुग्णालयात उपलब्ध आहेत. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार सुरु आहेत. पुण्यात आजपर्यंत जीबीएसचे १११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील खासगी रुग्णालयात सुद्धा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Pune GBS Cases News
Kalyan Crime: खळबळजनक! विद्यार्थ्याच्या अंगावर कार घातली, मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न; घटना CCTV मध्ये कैद

कुठल्या रुग्णालयात किती रुग्ण?

दिनानाथ रुग्णालय :- २६

ससून रुग्णालय :- २१

काशीबाई नवले रुग्णालय :- ०९

सह्याद्री डेक्कन :- ०७

पूना हॉस्पिटल :-०५

भारती विद्यापीठ :- ०४

वायसीएम :- ०४

पल्स हॉस्पिटल :- ०३

साईनाथ हॉस्पिटल :- ०३

डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय :-०२

ग्लोबल हॉस्पिटल :- ०२

श्रेयानस हॉस्पिटल :- ०२

पुण्यातील विविध भागातील इतर १३ रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्ण...

Pune GBS Cases News
Kalyan Crime: प्रवाशावर चाकू हल्ला करणं पडलं महागात, पोलिसांनी रिक्षाचालकाची काढली धिंड

वयोगट

० ते ०९ :- १९ रुग्ण

१० ते १९ :- १५ रुग्ण

२० ते २९ :- २० रुग्ण

३० ते ३९ :- १३ रुग्ण

४० ते ४९ :- १२ रुग्ण

५० ते ५९ :- १३ रुग्ण

६० ते ६९ :- ०८ रुग्ण

७० वर्षांवरील ०१ रुग्ण

Pune GBS Cases News
Pune Crime: गाडी नीट चालवा म्हटल्याने तरुणांची सटकली, मारहाण करत व्यावसायिकावर धारधार शस्त्राने वार

नागपुरातही जीपीएस आजाराचे रुग्ण

पुण्यात थैमान घालणाऱ्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचे चार रुग्ण नागपुरात मेडिकल कॉलेज आणि मेयोत दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मेडिकलमधील 19 वर्षाचा रुग्णाला कमी त्रास आहे. त्याला जनरल वार्डमध्ये उपचार सुरु आहेत. तर 8 वर्षाचा रुग्ण हा गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल आहे. तर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये 37 वर्ष रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. तसेच तिथे इतर रुग्ण उपचार घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com