Kalyan Crime: खळबळजनक! विद्यार्थ्याच्या अंगावर कार घातली, मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न; घटना CCTV मध्ये कैद

Kalyan Student Attacked: कल्याणमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. दोन तरुणांनी या विद्यार्थ्याला मारहाण करत त्याचे अपहरण देखील करण्याचा प्रयत्न केला.
Kalyan Crime: विद्यार्थ्याच्या अंगावर कार घातली, मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न; कल्याणमधील खळबळजनक घटना
Kalyan Crime News Saam Tv
Published On

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याणमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या अंगावर एका तरुणाने कार घालण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर कारमधून उतरून या विद्यार्थ्याला मारहाण केली. त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. कल्याणच्या लोकग्राम परिसरात ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सुयश तिवारी असे या कार चालवणाऱ्या तरुणाचे नाव असून श्लोक सावंत असे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नाव आहे.

श्लोक सावंतच्या पालकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस सुरक्षित नाही, बाहेरचे येणार आम्हाला भर रस्त्यात मारणार आपण काय मार खाऊन घ्यायचा का? असा सवाल श्लोकची आई जुही सावंत यांनी केला आहे. तसेच आपल्या मुलाला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील केली.

Kalyan Crime: विद्यार्थ्याच्या अंगावर कार घातली, मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न; कल्याणमधील खळबळजनक घटना
Kalyan Crime: प्रवाशावर चाकू हल्ला करणं पडलं महागात, पोलिसांनी रिक्षाचालकाची काढली धिंड

श्लोक सावंत कल्याण पूर्व लोकग्राम परिसरात राहतो. श्लोक बिर्ला कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. काल दुपारच्या सुमारास श्लोक आपल्या मित्रासह दुचाकीने बिर्ला कॉलेजहून घरी जाण्यासाठी निघाला. यावेळी सुयश तिवारी नावाचा तरुण थार कारमधून त्याचा पाठलाग करत होता. श्लोक लोकग्राम परिसरात घरी जाण्यासाठी उतरला असता त्याचा पाठलाग करणाऱ्या सुयशने कार श्लोकच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सुयश इथवरच थांबला नाही तर सुयश आणि त्याचा मित्र कामधून उतरले त्यांनी श्लोकला मारहाण करत त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

Kalyan Crime: विद्यार्थ्याच्या अंगावर कार घातली, मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न; कल्याणमधील खळबळजनक घटना
kalyan news : ऑनलाइन रमी खेळण्याचा नाद लागला, पैशासाठी चोर बनला; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून ७ लाखांचे सोनं लंपास

यावेळी श्लोकने आरडाओरड केला त्यामुळे सुयश आणि त्याचा मित्र तिथून निघून गेले. याप्रकरणी श्लोक आणि त्याच्या कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. आपल्या मुलाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत त्याला मारहाण करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी श्लोकची आई जुही सावंतने केली. तर घडल्या प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त करत जुही सावंत यांनी महाराष्ट्रात मराठी माणूस सुरक्षित नाही, बाहेरून येऊन आपल्याला मारणार आपण काय मार खायचा का? अशावर कठोर कारवाई केले पाहिजे अशी मागणी केली.

Kalyan Crime: विद्यार्थ्याच्या अंगावर कार घातली, मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न; कल्याणमधील खळबळजनक घटना
Kalyan Crime : कल्याण- डोंबिवलीत १३ अंमली पदार्थ तस्कर ताब्यात; कल्याण डीसीपी स्कॉडची वीस दिवसात कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com