
चेतन व्यास, साम प्रतिनिधी
आर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात एक संतापजनक घटना घडलीय. इंस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने वर्धा जिल्हा हादरुन गेलाय. विशेष म्हणजे याप्रकरणातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील अल्पवयीन मुख्य आरोपीसह इतर तीन जणांना अटक करण्यात आलीय. प्रणय बुलबुले (19), शुभम लाडके (22), शुभम सारसर (27), अक्षय पारवे (22) सर्व रा. आर्वी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुलीचे वर्धा जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील एका मुलासोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. याच ओळखीतून मुलीला भेटण्यासाठी आरोपी मुलगा हा आर्वीच्या गांधी चौक येथे आला. तेथून त्याने मुलीला दुचाकीवर बसवून जवळच एका गावातील घरी नेलं. ते घर त्याच्या नातेवाईकाचं होतं. त्यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तेथे काही वेळेत चार आणखी युवक आले. त्यांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या घटनेची तक्रार आर्वी पोलिसात करण्यात आली आहे.
पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या घटनेमुळे आर्वी परिसरात खळबळ माजलीय. अल्पवयीन मुख्य आरोपी सह इतर प्रणय बुलबुले (19), शुभम लाडके (22), शुभम सारसर (27), अक्षय पारवे (22) सर्व रा. आर्वी अशी अटक आरोपीची नावे आहे.
या घटनेतील मुख्य आरोपी सुद्धा अल्पवयीन असल्याची माहिती आहे. आरोपीची आर्वी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातील अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर ओखळ झाली होती. याच ओळखीतून वर्धा जिल्ह्यातील अल्पवयीन युवक हा तरुणीला भेटायला आला.
तिला आपल्या मोटरसायकलवर बसवून एका गावात नेलं. त्या गावात त्याचे नातेवाईक राहत होते. नातेवाईकांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ते ज्या घरात होते, त्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला. घराचा दरवाजा कोणी ठोकला हे पाहण्यासाठी अल्पवयीन आरोपीने दरवाजा उघडला. तेव्हा घरात आणखी चार लोकांनी प्रवेश केला. घरात आलेल्या चार लोकांनी मुलीचा इंस्टाग्रामवरील मित्राला घराच्या हॉलमध्ये बसवून ठेवलं.
नंतर त्या अल्पवयीन मुलीला बेडरूममध्ये नेले. तेथे त्यांनी आळीपाळीने अत्याचार केला. जवळपास एका तास त्या नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर अल्पवयीन आरोपीने आपल्या दुचाकीने तरुणीला तिच्या घरी सोडले. तरुणीने सदर घटनेची माहिती आपल्या आईला देताच आईने आर्वी पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना केले. काही वेळेतच पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. यात एक अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे समजले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.