परळी (बीड) : विधानसभा निवडणुक मतदान प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस गार्डचा जबाब नोंदविण्यात आला असून आता तीन महिन्यानंतर गुन्हा नोंद करण्यात येत आहे. यात कैलास फड याच्यासह इतर साथीदारावर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.
बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यादरम्यान मतदानादिवशी राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केली. याच प्रकरणात राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाच जणांवर गुन्हा दाखल
पोलीस गार्डचा जबाब नोंदवण्यात आला असून तो उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. दरम्यान याच अनुषंगाने मारहाण करणारा कैलास फड याच्यासह इतर साथीदारावर गुन्हा नोंदविला जाणार आहे. पोलीस गार्ड मोहन रामा दांडगे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला. त्याचबरोबर धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आल्याने कैलास फड त्याचा मुलगा निखिल फड व इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळीबारप्रकारणी गेल्या महिन्यातच फड विरोधात गुन्हा
मात्र गुन्हा नोंदविण्यास एवढा विलंब का लावला? असा सवाल देखील उपस्थित केला जातो आहे. सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपी कैलास फड याच्यावरती गेल्या महिनाभरापूर्वी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक देखील झाली होती. त्याचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. यानंतर दुसरा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.