Crime News: आरोग्य विभागाची धडक कारवाई, कारंजा शहरातील लिंग चाचणी प्रकरण उघड, सोनोग्राफी मशीन केली सील

Washim News: वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने छापा टाकून कारवाई केली.
Washim News
Washim News
Published On

वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान होत असल्याच्या माहितीवरून आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे वाशिम, कारंजा आणि अकोला आरोग्य विभागाच्या पथकाने रुग्णालयावर रात्री छापा टाकला. या छाप्यात रुग्णालयात ५ गर्भवती महिला गर्भलिंग निदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले.

या महिलांपैकी २ महिला बुलढाणा जिल्ह्यातील, २ अकोला जिल्ह्यातील आणि १ महिला वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील होती. आरोग्य विभागाला लिंग निदान होत असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर, ६ सदस्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने सापळा रचून एका गर्भवती महिलेला बनावट रुग्ण म्हणून रुग्णालयात पाठवले.

Washim News
Jalna News: शेतकऱ्यांसाठी निधीच नाही, जालन्यात ४७ कोटींचे ठिबक सिंचन अनुदान थांबले, १२ हजार शेतकरी अडचणीत

तिथे तिची भेट एका एजंटशी झाली, ज्याने तिला लिंग निदानाची हमी देत २०,००० रुपयांची मागणी केली. त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनंतर आरोग्य विभागाने तत्काळ छापेमारी केली. छाप्यादरम्यान, पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली आणि एजंटकडून ६०,००० रुपये रोख रक्कम तसेच ५ मोबाईल जप्त केले. या कारवाईत आरोग्य विभागाने लिंग निवड प्रतिबंधक कायद्याच्या उल्लंघनावर ठोस पाऊल उचलत गंभीर कारवाई केली.

Washim News
Pune : पुरणपोळीत पुरण कमी घातलं! ग्राहकाचा पारा चढला, स्नॅक्स सेंटर चालकालाच हाणला

आरोग्य विभागाच्या मते, गर्भलिंग निदानासारख्या बेकायदेशीर प्रकारामुळे महिलांच्या जन्मदरावर आणि समाजावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारांवर कडक कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे कारंजा शहरात खळबळ उडाली असून आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

Washim News
Amaravati: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा, मुदतवाढीची प्रतीक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com