Pune : पुरणपोळीत पुरण कमी घातलं! ग्राहकाचा पारा चढला, स्नॅक्स सेंटर चालकालाच हाणला

Pune Crime News: पुण्यातील वाघोलीत पुरणपोळीतील पुरण कमी असल्याच्या वादावरून मारहाण आणि शिवीगाळ झाली. मंगळवारी आस्वाद ५१ या स्नॅक्स सेंटरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv
Published On

अक्षय बडवे/ साम टिव्ही न्यूज

पुण्यातील वाघोली परिसरात पुरणपोळीतील पुरण कमी असल्यावरून वाद निर्माण होऊन मारहाणीची आणि शिवीगाळी करण्याची घटना घडली आहे. वाघोली येथील आस्वाद ५१ या स्नॅक्स सेंटरमध्ये मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे "आस्वाद ५१" नावाचे स्नॅक्स सेंटर आहे. सकाळी दोन ग्राहकांनी स्नॅक्स सेंटरमध्ये येऊन पुरणपोळी ऑर्डर केली. मात्र, खाताना त्या पुरणपोळीत पुरण कमी असल्याचा आरोप करून ग्राहकांनी वाद घातला. या वादाच्या वेळी ग्राहकांपैकी एकाने स्नॅक्स सेंटर चालकाला आधी शिवीगाळ केली आणि नंतर खुर्चीने मारहाण केली.

Pune Crime News
Amaravati: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा, मुदतवाढीची प्रतीक्षा

वाद मिटवण्यासाठी फिर्यादी यांची बहीण मधे आली असता, आरोपींनी तिलाही शिवीगाळ केली आणि मारहाण करत धमक्या दिल्या. या सगळ्या प्रकारानंतर आरोपी आपल्या साथीदारासोबत बिल न देता स्नॅक्स सेंटरमधून निघून गेले. या घटनेनंतर स्नॅक्स सेंटर चालकाने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आहे. मारहाणीच्या आरोपाखाली आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Pune Crime News
Bombay High Court: जिल्हा परिषद सीईओंचा पगार रोखला, शिक्षकांचा पगार न दिल्याने हायकोर्टाचे आदेश

सामान्यतः ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता असते, परंतु या घटनेत वादाला हिंसक वळण लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पुरणपोळीतील पुरणाच्या प्रमाणावरून सुरू झालेला वाद थेट शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत पोहोचल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकारामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांकडून तातडीने कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Pune Crime News
Seat Belt: गाडी चालवताना अपघात टाळण्यासाठी सीट बेल्ट लावणे का गरजेचे आहे? वाचा परिणाम आणि धोके

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com