Seat Belt: गाडी चालवताना अपघात टाळण्यासाठी सीट बेल्ट लावणे का गरजेचे आहे? वाचा परिणाम आणि धोके

Seat Belt Safety Tips: गाडी चालवताना सीट बेल्ट लावणे किती महत्त्वाचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. तुमच्या सुरक्षेसाठी सीट बेल्टचा उपयोग अनिवार्य आहे, याबद्दल अधिक सविस्तर माहिती येथे मिळवू शकता.
Seat Belt
Seat Belt
Published On

आजच्या घडीला अनेक लोक प्रवासासाठी मेट्रो, बस, टॅक्सी यासारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, तर काहीजण स्वतःच्या वाहनांनी प्रवास करतात. दुचाकी आणि कार चालवणाऱ्या लोकांसाठी रस्ता आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. याशिवाय, वाहन चालवताना सीट बेल्ट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे केवळ दंड टाळण्यासाठीच नव्हे तर तुमच्या सुरक्षिततेसाठीही गरजेचे आहे. सीट बेल्ट अपघातांच्या वेळी प्राण वाचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. म्हणून, वाहन चालवताना नियम पाळा आणि सीट बेल्ट वापरण्याच्या सवयीला प्राधान्य द्या. सीट बेल्टच्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घेऊ या.

पहिलं कारण

सीट बेल्ट लावणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ते तुमचे प्राण वाचवू शकते. सीट बेल्टमुळे अपघातात होणाऱ्या मोठ्या धोक्यांपासून संरक्षण मिळते. कारच्या पुढच्या किंवा मागच्या सीटवर बसलेल्यांनी सुरक्षिततेसाठी नेहमी सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे. तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे.

Seat Belt
Home Remedies For Teeth: किडलेल्या दातांसाठी आणि दातदुखी कमी करण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय

तीसरे कारण

गाडी चालवताना ड्रायव्हर किंवा प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्यास तुम्हाला दंडाचा सामना करावा लागू शकतो. रस्त्यावरच्या कॅमेऱ्याद्वारे किंवा वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून चलन जारी होऊ शकते. केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या कलम 138(3) अंतर्गत, सीट बेल्ट न लावल्याबद्दल १,००० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करा.

Seat Belt
Promise Day 2025: 'प्रॉमिस डे' ला जोडीदाराला द्या 'हे' खास वचन, नाते अधिक मजबूत होईल

हे पण जाणून घ्या

-सेव्ह लाईफ फाउंडेशनने २०१९ मध्ये ११ शहरांमधील लोकांच्या सीट बेल्टवर एक अभ्यास केला. या अभ्यासात ६३०६ लोकांचा समावेश करण्यात आला होता ज्यामध्ये असे आढळून आले की फक्त ७ टक्के लोक सीट बेल्ट घालतात.

-त्याच वेळी, आकडेवारीनुसार, भारतात, मागच्या सीटवर बसलेल्या १० पैकी ७ प्रवासी सीट बेल्ट लावत नाहीत.

Seat Belt
Hug Day 2025: आयुष्यात पहिल्यांदाच मुलीला 'हग' करणार आहात? 'या' टिप्सने क्षण करा स्पेशल!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com