Promise Day 2025: 'प्रॉमिस डे' ला जोडीदाराला द्या 'हे' खास वचन, नाते अधिक मजबूत होईल

Special Promise : प्रॉमिस डे हा नात्यात विश्वास, निष्ठा आणि आदर वाढवण्यासाठी खास दिवस आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी वचन द्यायचे असेल, तर ही प्रेमळ वचने नाते अधिक घट्ट आणि मजबूत करू शकतात.
Promise Day 2025
Promise Day 2025Freepic
Published On

व्हॅलेंटाईन वीक प्रेम आणि नातेसंबंधांना साजरे करण्याचा खास काळ आहे, जिथे प्रत्येक दिवसाची वेगळी खासियत असते. या आठवड्यातील पाचवा दिवस 'प्रॉमिस डे' म्हणून ओळखला जातो. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना दिलेली वचने आठवतात आणि नवीन वचन देऊन त्यांचे महत्त्व अधोरेखित करतात. प्रॉमिस डे हा विश्वास आणि नात्यांची बांधिलकी दृढ करण्याचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या खास व्यक्तींना वचन देऊन त्यांच्या जीवनातील तुमच्या स्थानाचे महत्त्व व्यक्त करू शकता.

'प्रॉमिस डे' हा व्हॅलेंटाईन वीकमधील पाचवा दिवस असून, दरवर्षी ११ फेब्रुवारीला साजरा केला जातो. २०२५ मध्येही हा दिवस मंगळवारी, ११ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना खास वचन देतात, जे त्यांचे नाते अधिक मजबूत आणि विश्वासार्ह बनवते. प्रियकर, जोडीदार किंवा मित्रांसोबत दिलेली ही वचने नात्यांतील आपुलकी आणि बांधिलकी अधोरेखित करण्याचा सुंदर मार्ग ठरतो.

Promise Day 2025
Valentine's Week: रोझ डे पासून व्हॅलेंटाइन डे पर्यंत रोज परिधान करा एक वेगळा आणि खास रंगाचा ड्रेस

का साजरा केला जातो प्रोमिस डे?

प्रॉमिस डे का साजरा केला जातो याची ठोस माहिती नाही, परंतु यामागे एक गहन अर्थ आहे. कोणत्याही नात्याचे खरे स्तंभ म्हणजे विश्वास आणि वचनबद्धता. जेव्हा आपण कोणावर मनापासून प्रेम करतो किंवा नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा परस्पर विश्वास आणि समर्पण महत्त्वाचे ठरते. प्रॉमिस डेच्या निमित्ताने लोक आपल्या जोडीदाराला वचन देतात की ते नेहमी त्यांच्यासोबत राहतील, त्यांचा आदर करतील आणि सर्व परिस्थितीत पाठिंबा देतील. हा दिवस केवळ प्रेमींसाठीच नाही तर मित्र, पालक आणि भावंडांसाठीही खास आहे. निष्ठा, प्रेम आणि विश्वास दृढ करण्यासाठी या दिवशी विशेष वचने देऊन नाती आणखी घट्ट केली जातात.

Promise Day 2025
Single On Valentines: सिंगल आहात का? व्हॅलेंटाइन डे साजरा करा यावर्षी खास पद्धतीने

पुढील वचने तुम्ही तुमच्या जोडीदाराला देऊ शकता

- एकमेकांचा नेहमी सन्मान करण्याचे वचन द्या.

- जीवनाच्या प्रत्येक चढ-उतारात हातात हात घालून राहण्याचे वचन द्या.

- नात्याला कायम प्राधान्य देण्याचे वचन द्या.

- विश्वास आणि निष्ठा टिकवण्याचे वचन द्या.

- एकमेकांच्या सुखासाठी प्रयत्नशील राहण्याचे वचन द्या.

- छोट्या गोष्टींमधील आनंद शोधण्याचे वचन द्या.

- आपली स्वप्ने आणि ध्येय एकत्र पूर्ण करण्याचे वचन द्या.

- मोकळ्या संवादाने नाते दृढ करण्याचे वचन द्या.

- नात्यात नेहमी नवीन ऊर्जा आणि ताजेपणा ठेवण्याचे वचन द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com