Dhanshri Shintre
14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो, जिथे प्रेमी युगुल एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतात आणि खास क्षण एकत्र घालवून आपले नाते अधिक दृढ करतात.
प्रेमी युगुलांसाठी व्हॅलेंटाइन डे खास असतो, पण सिंगल लोकांसाठी तो फक्त एक साधा दिवस वाटतो, ज्यामध्ये त्यांच्या आयुष्यात विशेष काही घडत नाही.
सिंगल लोकांच्या भावना त्यांनाच ठाऊक असतात, पण हा दिवस फक्त प्रेमींसाठीच नाही. सिंगल लोकही हा दिवस स्वतःसाठी खास पद्धतीने साजरा करू शकतात.
सिंगल असाल तरी व्हॅलेंटाइन डे खास साजरा करता येतो. तुमच्यासाठीही आनंद साजरा करण्याचे, स्वतःला खास वाटण्याचे आणि दिवस संस्मरणीय बनवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
या दिवशी स्वतःला सर्वात जास्त महत्त्व द्या. या दिवशी स्वतःवर प्रेम करा. आवडते पुस्तक वाचा किंवा शांत संगीत ऐका. तुम्हाला आनंददायी वाटेल असे काहीतरी खास स्वतःसाठी करा.
व्हॅलेंटाइन डे आणि त्यानंतरची दोन सुट्टी घेऊन, एखाद्या शांत ठिकाणी फिरायला जा. जिथे तुम्हाला खूप दिवसांपासून जाण्याची इच्छा होती, पण वेळ मिळत नव्हता.
तुमच्या आवडीच्या छंदाची निवड करा, जसे पेंटिंग, डान्स, लेखन, फोटोग्राफी, आणि या व्हॅलेंटाइन डे ला त्याची सुरुवात करा. हे तुमचं आत्मविकसन आणि आनंद मिळवण्यासाठी उत्तम माध्यम ठरू शकते.
शॉपिंग ही माइंड डायव्हर्ट करण्याची उत्तम पद्धत आहे. तुम्ही लोकल मार्केटमध्ये जाऊन फेरफटका मारू शकता आणि चांगल्या वस्तू खरेदी करण्याचा अनुभव घेऊ शकता.
तुम्ही अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमाला भेट देऊन गरजूंच्या मदतीसाठी काही करू शकता. त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहून तुमचं मन आनंदाने भरून जाईल.
14 फेब्रुवारीला अॅडव्हेंचर ट्रिप प्लॅन करा. बंजी जंपिंग, रिव्हर राफ्टिंगसारखे रोमांचक अॅडव्हेंचर स्पोर्ट्स करून तुमचा दिवस खास बनवा.
व्हॅलेंटाइन्स डेसाठी तुमचे मित्र व्यस्त असू शकतात, पण तुम्ही एकटे राहू नका. तुमच्या सिंगल मित्रांना एकत्र करून, तेथे एकत्र जेवण करा आणि फिरायला जा.