Jalna News: शेतकऱ्यांसाठी निधीच नाही, जालन्यात ४७ कोटींचे ठिबक सिंचन अनुदान थांबले, १२ हजार शेतकरी अडचणीत

Farmres In Trouble: जालना जिल्ह्यातील १२ हजार शेतकऱ्यांचे पर ड्रॉप मोर क्रॉप योजनेअंतर्गत ठिबक सिंचनासाठी मिळणारे ४७ कोटी ५४ लाख ४६ हजार रुपये अनुदान अद्याप थकीत आहे.
Farmres In Trouble
Farmres In TroubleYandex
Published On

जालना जिल्ह्यातील १२ हजार शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेअंतर्गत मिळणारे ४७ कोटी ५४ लाख ४६ हजार रुपये अनुदान अद्याप थकित आहे. कृषी विभागाच्या पर ड्रोप मोर क्रॉप योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. परंतू, सध्या निधीअभावी अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. जिल्ह्यात एकूण 17,920 शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला होता.

मात्र, यापैकी 12 हजार शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. सरकारी निधीचा अभाव असल्यामुळे हे अनुदान थांबले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेषत: भोकरदन तालुक्यातील शेतकरी या समस्येने सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. या तालुक्यातील अनुदान रखडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Farmres In Trouble
Bombay High Court: जिल्हा परिषद सीईओंचा पगार रोखला, शिक्षकांचा पगार न दिल्याने हायकोर्टाचे आदेश

सद्यस्थितीत जलसंपदा जपण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, शेतकऱ्यांचे थकीत अनुदान आणि निधीअभावी अडचणी वाढत असल्याने योजनेचा उद्देश फोल ठरतोय. शेतकऱ्यांच्या या आर्थिक समस्येवर लवकर तोडगा निघाला तरच त्यांना दिलासा मिळू शकतो.

Farmres In Trouble
Amaravati: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा, मुदतवाढीची प्रतीक्षा

तालुकानिहाय प्रलंबित अनुदान

1. अंबड: शेतकरी 1372, रक्कम 7 कोटी 45 लाख 35 हजार 718 रुपये

2. बदनापुर: शेतकरी 787, रक्कम 3 कोटी 32 लाख 64 हजार 191 रुपये

3. भोकरदन: शेतकरी 5536, रक्कम 24 कोटी 8 लाख 81 हजार 275 रुपये

4. घनसावंगी: शेतकरी 443, रक्कम 1 कोटी 68 लाख 18 हजार 282 रुपये

5. जाफराबाद: शेतकरी 875, रक्कम 6 कोटी 31 लाख 52 हजार 491 रुपये

6. जालना: शेतकरी 804, रक्कम 1 कोटी 95 लाख 82 हजार 507 रुपये

7. मंठा: शेतकरी 568, रक्कम 1 कोटी 18 लाख 53 हजार 515 रुपये

8. परतुर: शेतकरी 543, रक्कम 1 कोटी 53 लाख 58 हजार 608 रुपये

Farmres In Trouble
Pune : पुरणपोळीत पुरण कमी घातलं! ग्राहकाचा पारा चढला, स्नॅक्स सेंटर चालकालाच हाणला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com