मुंबई/पुणे

Mumbai Crime : बायकोचा शरीरसंबंधासाठी नकार, नवऱ्याचं क्रूर कृत्य, मुंबई हादरली

Husband’s Cruel Act After Wife Refuses Intimacy : मुंबईच्या चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार – पत्नीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे पतीने रॉकेल ओतून पेटवले. महिला ७० टक्के भाजली असून प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

Chembur Vashi Naka News : मुंबईमधील चेंबूरमध्ये हादरावणारी घटना घडली आहे. शरीरसंबंधासाठी नकार देणाऱ्या बायकोला नवऱ्याने रागाच्या भरात रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. चेंबूरमधील वाशी नाका येथे ही धक्काकादायक घटना घडली. याप्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेत महिला ७० टक्के भाजली असून तिच्यावर सायन येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईतील चेंबूरमधील वाशी नाका परिसरात 30 मे 2025 रोजी ही धक्कादायक घटना घडली. एका ३८ वर्षीय महिलेला तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात रॉकेल ओतून पेटवून दिले. ही घटना सकाळी कामावर जाण्याच्या तयारीदरम्यान घडल्याचे समोर आले. या हल्ल्यात महिला ७० टक्क्यांहून अधिक भाजली असून, तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले आहे.

चेंबूर नाका पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचारासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही घटना मुंबई आणि राज्यात खळबळ माजवणारी आहे. एकीकडे वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट असतानाच आणखी एक घरगुती हिंसाचाराची घटना समोर आली आहे. मुंबईतील या क्रूर कृत्याचा स्थानिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे. पोलिसांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT