Mumbai Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: साडीची डिलिव्हरी करायला आला, पैसे देताना मुलीला दाखवला अश्लील व्हिडीओ; मुंबईतील संतापजनक प्रकार

Mumbai Dilivery Boy Crime: मुंबईमध्ये डिलिव्हरी बॉयने संतापजनक प्रकार केला. साडीची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या या तरुणाने पेमेंट दाखवण्याच्या बहाय्याने अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवला.

Priya More

Summary -

  • मालाडमध्ये संतापजनक घटना घडली

  • डिलिव्हरी बॉयने अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले

  • कुटुंबीयांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

  • मलाड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली

संजय गडदे, मुंबई

मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. ही घटना मुंबईतल्या मालाड परिसरात घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. आरोपीने आणखी कुठल्या मुलीसोबत असं कृत्य केले का याचा तपास केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाइन साडीची ऑर्डर दिली होती. डिलिव्हरी बॉय साडी घेऊन दुपारच्या सुमारास त्या महिलेच्या घरी आला. महिलेने त्याला पैसे दिले पण त्याच्याकडे परत देण्यासाठी सुट्टे पैसे नाहीत कुणाला तरी माझ्यासोबत पाठवा मी पैसे देतो असे त्याने सांगितले. डिलिव्हरी बॉयने सुट्टे पैसे घेण्यासाठी बिल्डिंगखाली बोलावले. महिलेने पैसे घेण्यासाठी आपल्या १२ वर्षाच्या मुलीला डिलिव्हरी बॉयसोबत पाठवले.

यावेळी आरोपी डिलिव्हरी बॉयने'पेमेंट डिटेल्स' दाखवण्याच्या बहाण्याने महिलेच्या मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवण्यास सुरूवात केली. आरोपीचे हे कृत्य पाहून मुलगी प्रचंड घाबरली. जेव्हा ती मुलगी ओरडायला लागली त्यानंतर आरोपी फरार झाला. घरी आल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. महिलेने आपल्या मुलाला आणि नवऱ्याला या घटनेची माहिती दिली.

त्यांनी तात्काळ बायकोने ज्या दुकानातून साडी ऑर्डर केली होती तिथे धाव घेतली. त्यांनी आरोपी डिलिव्हरी बॉयला पकडलं आणि मालाड पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मालाड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद उपेश अनवर अंसारी असून तो मालाडच्या मालवणी परिसरातील रहिवासी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT