Mumbai Police: मुंबई पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई! फक्त ३ महिन्यात ३६७ फरार आरोपींना अटक

Crime News: मुंबई पोलिसांनी विशेष मोहिमेत तीन महिन्यांत ३६७ फरार आरोपींना अटक केली. २० वर्षांपासून फरार असलेले गुन्हेगारही जेरबंद झाले असून जुन्या प्रकरणांना गती मिळणार आहे.
Arrest of 367 accused
Mumbai Police crackdowngoogle
Published On
Summary

मुंबई पोलिसांनी ३ महिन्यांत ३६७ फरार आणि वॉन्टेड आरोपींना अटक केली

१८ आरोपी २० वर्षांहून अधिक काळ फरार होते

जुन्या प्रलंबित गुन्हे प्रकरणांना गती मिळण्याची शक्यता

मुंबई पोलीसांनी आत्तापर्यंतची मोठी कारवाई पार पाडली आहे. यात त्यांना मोठं यश मिळालं आहे. आता गुन्हेगार पोलीसांच्या तावडीतून सुटणं अशक्यच आहे. कितीही जुनी कारवाई असली तरी त्यावर मुंबई पोलीसांचा तपास सुरु असतो हे यावरुन कळतं.

मुंबई पोलीसांनी जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ३६७ वॉन्टेड आणि फरार आरोपींना अटक करत मोठे यश मिळवले आहे. ही मोहीम पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजन करून राबवण्यात आली होती.

पोलीसांच्या या मोहिमेदरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, अनेक प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक झालेल्यांपैकी १८ आरोपी हे २० वर्षांहून अधिक काळ फरार होते. यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गुन्हे प्रकरणांना गती मिळण्याची शक्यता आहे.

Arrest of 367 accused
Kokan M2M Ferries : कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या M2M फेरीला आणखी दोन ठिकाणी थांबा मिळणार; जाणून घ्या

या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष म्हणजे, अटक झालेल्यांपैकी १८ आरोपी हे २० वर्षांहून अधिक काळापासून फरार होते. यावरून मुंबई पोलिसांच्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कारवाईचे दर्शन घडते.

या मोहिमेतील ठळक यश म्हणजे आझाद मैदान पोलिस ठाण्याने १९८७ पासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली, तर एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी १९८८ पासून फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. मुंबई पोलीस यांनी स्पष्ट केलं की, न्यायप्रक्रियेपासून पळ काढणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच ठेवली जाईल. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा मोहिमा भविष्यातही राबवण्यात येणार आहेत.

कालावधीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींचे प्रमाण पाहिले असता, २००५ पूर्वीचे (२० वर्षांपेक्षा जुने) १८, २००६ ते २०१० मधील ४, २०११ ते २०१६ मधील १०, २०१६ ते २०२० मधील ३३ आणि २०२१ ते २०२६ दरम्यानचे ३०२ आरोपींचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच न्यायप्रक्रियेपासून पळ काढणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Arrest of 367 accused
Jio Recharge: Jioचा स्पेशल रिचार्ज प्लान, 448 रुपयांमध्ये 3 महिन्यांची वैधता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com