सलग चौथ्या दिवशी पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. यावेळी कर्तव्य बजावत असलेला एक डिलिव्हरी बॉय पाण्यात पडला. त्याच्या दुचाकीला असलेला बॉक्स सुद्धा यावेळी उघडला गेला. तो पाण्यात पडल्याचे पाहून तीन जणांनी त्याला उचलून सावरून घेतलं. पाण्यातून वाट काढताना या डिलिव्हरी बॉयला मात्र मोठी कसरत करावी लागली. ही सगळी घटना काहींनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी भावनिक कमेंट्स केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.