Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: बोगस आधारकार्ड, मनी ट्रान्सफर... मुंबईतून ९ बांगलादेशींना अटक, कशी होती मोडस ऑपरेंडी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Police Arrested Bangladeshi People:

मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ९ बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्वजण बेकायदेशीरित्या भारतातून बांगलादेशमध्ये पैसे देखील ट्रान्सफर करायचे. मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) या तरुणांविरोधात कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणांनी बनावट आधार कार्ड बनवलं होतं. भारतातून बांग्लादेशात बेकायदेशीरपणे पैसे ट्रान्सफर करायचे. यात आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे एक प्रकारचे हवाला रॅकेट असल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

भारतातून बांग्लादेशमध्ये जाणाऱ्या किंवा बांगलादेशमधून भारतात येणाऱ्या व्यक्तींमार्फत हे पैसे ट्रान्सफर केले जात होते, असं गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरोपी अनेक वर्षांपासून मुंबईत राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या सर्वांनी बनावट आधारकार्डद्वारे भारतात प्रवेश मिळवला होता. त्यानंतर बँक अकाऊंट आणि इतर कागदपत्रे तयार केले होते. जेणेकरुन आपण भारतीय असल्याचं त्यांना भासवायचं होतं.

आता पोलिसांनी त्या लोकांचाही शोध सुरू केला आहे ज्यांच्या मदतीने आरोपींनी बनावट कागदपत्रे बनवून घेतली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी काही लोकांना मुंबईत तर काही लोकांना ठाणे आणि नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

आरोपी पैसे साठवल्यानंतर ते बांग्लादेशला जाणाऱ्या व्यक्तींमार्फत पैसे ट्रान्सफर करायचे. ही रक्कम जवळपास लाखात असायची. पैसे बेकायदेशीरपणे ट्रान्सफर करण्यासाठी ते कमिशन घ्यायचे. नेमकी किती रक्कम होती हे आताच सांगता येणार नाही, असंही पोलिसांनी सांगितले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT