Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबईत ड्रग्ज फॅक्ट्री उद्ध्वस्त, ५०.७४ कोटींचा मेफेड्रॉनचा साठा जप्त; कोण आहे मालक?

Drug Racket Busts In Mumbai: मुंबईमध्ये मोठं ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज फॅक्ट्री उद्ध्वस्त केली. तब्बल ५०.७४ कोटींचा मेफेड्रॉनचा साठा जप्त करण्यात आला.

Priya More
  • मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई

  • मेफेड्रॉन तयार करणाऱ्या फॅक्ट्रीवर छापा

  • मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधी मोठी कारवाई

  • ५० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले

संजय गडदे, मुंबई

मुंबई पोलिसांनी ड्रग्ज फॅक्ट्री उद्ध्वस्त केली. जवळपास ५०.७४ कोटींचा मेफेड्रॉनचा साठा जप्त करण्यात आला. मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने आग्रीपाडा परिसरात ही मोठी कारवाई केली. यावेळी मेफेड्रॉन तयार करणारी बेकायदा प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईत तब्बल १४ किलो ४९३ ग्रॅम मेफेड्रॉन आणि लिक्विड एमडीसह एकूण ५० कोटी ७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच एक गावठी पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार शहर आणि उपनगरात अंमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटला २५ मे रोजी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आग्रीपाडा परिसरात सापळा रचून एका राहत्या घरात सुरू असलेली ड्रग्ज निर्मिती प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ८ किलो ३०५ ग्रॅम लिक्विड एमडी आणि संबंधित साहित्य जप्त केले असून त्याची किंमत सुमारे २९ कोटी ८ लाख रुपये आहे. तसेच ६ किलो १८८ ग्रॅम मेफेड्रॉन पावडर स्वरूपातील एमडी जप्त करण्यात आले असून त्याची किंमत २१ कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे. याशिवाय ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने, कच्चा माल, उपकरणे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. तपासादरम्यान आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसेही मिळून आली. या शस्त्रास्त्रांची किंमत अंदाजे ६४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कक्ष कांदिवली युनिटने गुन्हा क्रमांक ५४/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय हत्यार कायदा १९५९ मधील कलम ३ आणि २५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना २६ मे रोजी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी माहिती घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे की नाही याचा तपास पोलिस करत आहेत.

ही कारवाई पोलिस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत जगदाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक उल्हास खोलम आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वी केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC चा मोठा निर्णय! नोटरी घरांवरील कर नाव हस्तांतरणास हिरवा कंदील

Thane Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना बसणार फटका?

पुण्यात पाणी संकट आणखी गडद; कोणत्या धरणात किती साठा? ताजी आकडेवारी आली समोर

Skin Care: चेहऱ्यावर रोज टॅल्कम पावडर लावता? मेकअप आर्टिस्ट म्हणतात यामुळे चेहऱ्याला होतात हे त्रास

Maharashtra News Live Update: अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT