Vakola police news  AI Image
मुंबई/पुणे

Mumbai Crime : अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आला, अन् पैशांसाठी चोर झाला; सीसीटीव्हीने बिंग फुटले

Vakola police news : बॉलिवूडमध्ये अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या २१ वर्षीय तरुणाला वृद्ध महिलेची २१ ग्रॅम सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी २४ तासांत अटक केली. चोरीची संपूर्ण सोनसाखळी हस्तगत करण्यात आली.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Vakola police news : बॉलिवूडमध्ये अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने आर्थिक अडचणींमुळे चोरीचा मार्ग स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांताक्रूझ (पूर्व) येथील सिद्धार्थनगर परिसरात एका पॅरालिसिसग्रस्त वृद्ध महिलेच्या गळ्यातील २१ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी आशिष अत्तरचंद शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चोरीला गेलेली संपूर्ण सोनसाखळी हस्तगत केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारमधील पाटणा येथील रहिवासी असलेला आशिष शर्मा गेल्या महिन्यात बॉलिवूडमध्ये काम मिळवण्याच्या उद्देशाने मुंबईत आला होता. तो सांताक्रूझ (पूर्व) येथील यशवंतनगर परिसरात राहत होता. यापूर्वी त्याने भोजपुरी चित्रपटसृष्टीत काही चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र, मुंबईत अपेक्षित काम न मिळाल्याने त्याच्यावर आर्थिक संकट कोसळले आणि कर्जाचा ताण वाढत गेला, असा दावा पोलिसांनी केला आहे.

२० सप्टेंबर रोजी आरोपी सिद्धार्थनगर आणि वाकोला पाइपलाइन परिसरातील अरुंद गल्ल्यांमध्ये फिरत होता. तेथे एका चाळीच्या तळमजल्यावरील खोलीबाहेर पॅरालिसिसग्रस्त वृद्ध महिला बसलेली त्याला दिसली. आरोपीने चेहरा रुमालाने झाकून महिलेच्या गळ्यातील २१ ग्रॅमची सोनसाखळी हिसकावली आणि चाळीतील गल्ल्यांमधून पळ काढला.

घटनेनंतर पीडित महिलेचा मुलगा प्रेमसिंग हयातसिंग रावत (५०) यांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजमध्ये संशयित व्यक्तीच्या हालचाली स्पष्ट दिसून आल्या. तपास टाळण्यासाठी आरोपीने आपला वेश बदलण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीची माहिती स्थानिक खबऱ्यांच्या जाळ्याद्वारे प्रसारित केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी यशवंतनगर येथील श्यामसुंदर चाळीत छापा टाकून आशिष शर्माला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीकडून चोरीला गेलेली २१ ग्रॅमची सोनसाखळी पूर्णपणे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक (PSI) सुशांतकुमार पाटील, PSI अमटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (ASI) मसणे, हवालदार भिसे, तसेच गायकवाड, गुरव, भोसले, मुन्ने, गवळी, जोशी, शेणवी आणि ओंकार गायकवाड यांच्या पथकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT