Mulund railway station local train accident news : ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवशी मुंबईमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातवरण असते. मुंबईकर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरतात. त्याचवेळी त्यांच्या सेवेत मुंबई पोलीस दिवसरात्र एक करत असतो. पण कधीतरी त्याच्यावरही संकट येते. ३१ डिसेंबरची ड्युटी करून घरी जाणाऱ्या पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला. देविदास सस्ते असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मुलुंड रेल्वे स्टेशनवर लोकलमधून पडून मृत्यू झाला.
देविदास सस्ते हे सध्या सहारा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ३१ डिसेंबर रोजी कर्तव्य बजावून ते घरी जात असताना मुलुंड येथे लोकल मधून तोल जाऊन खाली पडले. त्यांच्यासोबत असलेले वाहतूक विभागाचे पो. ब्राह्मणे यांनी तात्काळ जवळच्या अग्रवाल रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगितले. देविदास सस्ते यांच्यावर काही दिवसापूर्वी अंजॉग्रफी करण्यात आलेले होते
३१ डिसेंबर २०२५ रोजी बुधवारी संध्याकाळी मुलुंड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल देविदास सस्ते यांचा तोल गेल्याने आणि प्लॅटफॉर्मवर कोसळल्याने मृत्यू झाला, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास सस्ते यांना काही वर्षांपासून हृदयविकाराच्या गंभीर आजारांनी ग्रस्त होते. त्यांच्या हृदयात चार ब्लॉकेज होते. ते ७ ऑगस्ट ते २५ नोव्हेंबर या कालावधीत वैद्यकीय रजेवर होते. कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांची अँजिओग्राफी झाली होती. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर, २६ नोव्हेंबर रोजी ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. पण ३१ डिसेंबर रोजी त्यांच्यावर काळाने घातला. त्यांच्या निधनांतर सस्ते कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.