Worli Hit And Run Saam Tv
मुंबई/पुणे

Worli Hit And Run: 'हिट अँड रन' सत्र थांबेना! वरळीत भरधाव BMW कारची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

Worli Hit And Run Case: वांद्रे वरळी सी लिंक जवळ अब्दुल गफार खान मार्गावर एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने स्कूटरला मागून धडक दिली होती. या धडकेत स्कूटरवरील व्यक्ती गंभीर जखमी झाली होती.

Gangappa Pujari

सचिन गाड| मुंबई , ता. २९ जुलै २०२४

राज्यामध्ये हिट अँड रन अपघातांचे सत्रच सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच वाशीमध्ये एका भरधाव कारने दोन रिक्षांना धडक दिल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असतानाच वरळीमध्ये आणखी एक हिट अँड रनचा प्रकार समोर आला असून भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरळीत पुन्हा एकदा भरधाव बीएमडब्ल्यूच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २० जुलै रोजी वांद्रे वरळी सी लिंक जवळ अब्दुल गफार खान मार्गावर एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने स्कूटरला मागून धडक दिली होती. या धडकेत स्कूटरवरील व्यक्ती गंभीर जखमी झाली होती.

अपघातानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गेल्या सात दिवसांपासून नायर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र डोक्याला जखम होऊन कोमात गेल्याने त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. विनोद लाड (वय, २८ वर्ष) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नावे आहे.

या अपघातप्रकरणी कारचालक किरण इंदुलकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, वरळीमध्ये ९ जुलै रोजीअश्याच प्रकारे भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहाला अटक झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

SCROLL FOR NEXT