Crime Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ

55 year Man arrested for physically assaulting minor girl: बोरिवलीतील एका झोपडपट्टीत एक संतापजनक घटना घडली. एका ४ वर्षीय चिमुकलीवर ५५ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

राज्यात सध्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईतून एक संतापजनक घटना समोर येत आहे. मुंबईच्या बोरिवलीत एका ५५ वर्षीय नराधमाने ४ वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणानंतर चिमुकली प्रचंड घाबरली होती. नंतर तिच्या पालकांनी पीडित चिमुकलीला प्रेमाने विचारले. तेव्हा तिने सगळी आपबिती सांगितली. यानंतर संतप्त पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच नरधमाविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव राम ललित यादव असे आहे. रविवारी थंड पाणी देण्याच्या बहाण्याने मुलीला त्याच्या झोपडीत बोलावून घेतलं. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर 'कुणाला सांगितल्यास ठार मारेन' अशी चिमुकलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. यामुळे चिमुकली प्रचंड घाबरली. मुलगी घाबरतच आपल्या घरी निघून गेली.

मुलीचे बदलेले वर्तन आणि सतत घाबरत असल्यामुळे चिमुकलीच्या पालकांना संशय आला. पालकांना विचारपूस केली. मात्र, तरीही तिने काहीही सांगितले नाही. नंतर पालकांनी तिला प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा पीडित चिमुकलीने घडलेल्या घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी चिमुकलीला एमएचबी पोलीस ठाण्यात नेले. यासह मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच पोलिसांकडे नराधमाविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तातडीने घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी त्याला अटक केली. ताब्यात घेतल्यानंतर नराधमाला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात स्कूलबस गेली वाहून

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

SCROLL FOR NEXT