Nitesh Rane: 'मी खूप गोमुत्र पितो आणि ते आरोग्यासाठी खूप चांगलंय', नीतेश राणे बरंच काही बोलले

Nitesh Rane on Cow Urine A Healthy Habit or a Controversial Statement: मंत्री नीतेश राणे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. अलीकडे त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Nitesh Rane
Nitesh RaneSaam Tv
Published On

महाराष्ट्रतील मत्स आणि बंदरे खात्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. त्यांनी नुकतंच एक विधान केलं आहे. या विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नीतेश राणे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोमूत्राचे सेवन करत असल्याची माहिती दिली.

नीतेश राणेंना मुलाखतीदरम्यान, 'उन्हाळ्यात तुम्ही रूह अफजा पिता की गुलाब सरबत?' या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी थेटपणे, 'मी गोमूत्र खूप पितो. ते आरोग्यासाठी चांगलं असतं', असं राणे म्हणाले.

'मी गोमूत्र फार पितो'

एका हिंदी वृत्तवाहिनीला मंत्री नीतेश राणे यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. मुलाखतीच्या शेवटी एक हलकाफुलका प्रश्न विचारण्यात आला. 'उन्हाळ्यात तुम्ही रूह अफजा पिता की गुलाब सरबत?' या प्रश्नाला उत्तर देताना 'मी गोमूत्र फार पितो. ते आरोग्यासाठी खूप चांगलं असतं', असं राणे थेट म्हणाले.

Nitesh Rane
Marathi Actress: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने धर्म बदलला, फोटो पोस्ट करत दिली माहिती; नेटकरी म्हणाले..अगं

पुढे बोलताना नीतेश राणे म्हणाले, 'गुलाब सरबत आणि रूह अफजा मला कोण देतं? यावर बरंच काही अवलंबून आहे. मी तसं काही घेत नाही. रूह अफजा तसं गोड असतं. मला फारसं आवडतही नाही. चांगल्या भावनेनं मला रूह अफजा कुणी देणार नाही. आपण विचार करा, नीतेश राणेला कुणी रूह अफजा देईल का?' असंही नीतेशे राणे म्हणाले.

Nitesh Rane
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना साद घालताच भाजपमध्ये रूसवा? राज ठाकरेंच्या बंगल्याजवळ भाजपची बॅनरबाजी; फोटो व्हायरल

ठाकरे बंधूंच्या युतीवर नीतेश राणेंची टीका

सध्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या मुद्द्यावर मंत्री नीतेश राणेंनी उपहासात्मक प्रश्न उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

'मनसे पक्षाला टाळी देण्याआधी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरे यांच्याशी विचारणा केली होती का? हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारायला हवे. अशा निर्णयांमध्ये रश्मी ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्याला फार महत्त्व आहे', असं नीतेश राणेंनी उपहासात्मक प्रश्न उपस्थित करत ठाकरेंवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com