BEST Fare Hike Saam Tv
मुंबई/पुणे

BEST Fare Hike: मुंबईकरांच्या खिशाला फटका! बेस्ट बसच्या तिकीटात वाढ, दुप्पट पैसे मोजावे लागणार

Mumbai BEST Bus Ticket Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला फटका बसणार आहे. बेस्ट बसच्या तिकीटात दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आधी जे तिकीट ५ रुपयांना होते त्यासाठी आता १० रुपये मोजावे लागणार आहेत.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे.आता मुंबईकरांचा प्रवास आणखी महाग होणार आहे. बेस्ट बसच्या तिकीटात वाढ झाली आहे. आता तुम्हाला बस तिकीटासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे टेन्शन वाढले आहे. बेस्ट बसच्या तिकीटातील वाढ ही आजपासून झाली आहे. त्यामुळे तुम्ही याआधी ज्या तिकीट दरात प्रवास करत होता त्यापेक्षा दुप्पट पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहे. बेस्ट बस भाडेवाढीच्या प्रस्तानाला मुंबई महापालिका आणि परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.

दररोज हजारो मुंबईकर बेस्ट बसने प्रवास करतात. बेस्ट बसचं तिकीट तुलनेने कमी असल्याने बसमध्ये खूप गर्दी असायची. आता या तिकीटाची किंमत वाढवण्यात आली आहे. बेस्ट बसच्या तिकीटाची किमान किंमत ही ५ रुपये होती. आता या किंमतीत वाढ होऊन ते १० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे. तर एसी बसचं (AC Bus Fare) भाडं ६ रुपये होते. आता त्यासाठी तुम्हाला १२ रुपये मोजावे लागणार आहेत.

बेस्टच्या तिकीटात कितीने वाढ (BEST Bus Fare Hike)

५ किलोमीटरच्या अंतरापर्यंत बेस्ट बसचे तिकीट हे ५ रुपये होते आता या तिकीटाची किंमत १० रुपये झाली आहे. १० किलोमीटरपर्यंत १० रुपये तिकीट होते ते आता २० रुपये झाले आहेत. नॉन एसी बससाठी हे तिकीट आहे. तर एसी बससाठी ५ किमी अंतरापर्यंत ६ रुपये तिकीट होते याची किंमत आता १२ रुपये झाली आहे. १० किलोमीटरसाठी तुम्हाला २० रुपये मोजावे लागणार आहे. आजपासून ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. बेस्ट बसची ही भाडेवाढ प्रवाशांच्या खिशाला मात्र फटका देणारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT