
IPL 2025 मधला ४४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाताचा संघ आज प्रथम गोलंदाजी करणार आहे. हा सामना घरच्या स्टेडियमवर असल्याने केकेआरला फायदा होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
फलंदाजी निवडण्याच्या निर्णयामागील कारण सांगताना श्रेयस अय्यर म्हणाला, 'ईडन गार्डन्सवरचा शेवटचा सामना पाहिला. खेळपट्टीवर क्रॅक्स आहेत. फलंदाजी करताना अधिक मदत मिळेल. २०२४ मध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर इथे परतताना छान वाटत आहे. चांगला खेळ सुरु आहे'. तर दुसऱ्या बाजूला 'टॉस हरलो याचा अर्थ सामना गमावला असा होत नाही. यावेळी आम्ही लक्ष निश्चितच गाठण्याचा प्रयत्न करु' असे अजिंक्य रहाणेने म्हटले.
कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांमध्ये आजच्या सामन्यासाठी बदल करण्यात आले आहेत. मोईन अलीच्या जागी रोवमन पॉवेल आणि रमनदीप सिंगच्या जागी चेतन साकारिया प्लेईंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तर पंजाबच्या संघात ग्लेन मॅक्सवेल आणि अजमतुल्लाह ओमरजई यांनी कमबॅक केले आहे. मागे जेव्हा हे दोन आमनेसामने आले होते, तेव्हा पंजाबने कोलकाताला धुळ चारली होती, त्या पराभवाचा वचपा केकेआर काढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -
रहमानुल्लाह गुरबाज, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल, वैभव अरोरा, चेतन साकरिया, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -
प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जॉश इंग्लिस, नेहाल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्लाह अमरजई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.