Mumbai Best Bus Accident Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Best Bus Accident : मुंबईत भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवलं; अपघातात ३ जणांचा मृत्यू

Mumbai best Bus accident update : मुंबईत भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही

Mumbai best Bus accident : मुंबईच्या कुर्ल्यातून भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या कुर्ला एलबीएस रोडवर सोमवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. या रोडवर भरधाव बेस्ट बसने रोडवरील अनेकांना उडवले. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला येथील एलबीएस रोडवर ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. भरधाव बेस्ट बस अनेकांना धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट क्रमांक ३३२ ही बस कुर्ला येथून अंधेरीकडे जात होती. त्याचवेळी बेस्ट बसचा ब्रेक फेल होऊन बुद्ध कॉलनीजवळील आंबडेकर नगर येथे हा अपघात झाला आहे.

कुठे घडली घटना?

कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथील बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या १० ते १२ जणांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातील जखमींना सायन आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३२२ क्रमांकाच्या भरधाव बेस्ट बसने धडक रस्त्यावरून चालणाऱ्या धडक दिली. या वेळी रस्त्यावर चालणाऱ्या १० ते १२ लोकांना बसने चिरडलं. बेस्ट बसच्या धडकेत रिक्षा चक्काचूर झाली आहे. या भीषण अपघातानंतर लोकांची घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. या अपघातानंतर काही संतप्त लोकांनी बेस्ट बसची तोडफोड केली. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT