Mumbai Billionaire Beggar Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईचा बिलेनियर भिकारी! दादरच्या शिवाजी पार्कजवळ घर, ठाण्यात २ दुकाने, २ फ्लॅट; वाचा डोळे विस्फारून टाकणारी स्टोरी

Mumbai Billionaire Beggar : मुंबईतील भिकारी भरत जैन याने चार दशकांत भिक्षा मागून आणि हुशारीने गुंतवणूक करून तब्बल ₹७.५ कोटींची संपत्ती उभी केली आहे. आलिशान फ्लॅट, दुकाने आणि लाखो रुपयांचे भाडे मिळवणारा हा भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी ठरला आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईतील भिकारी भरत जैन यांच्याकडे ७.५ कोटींची मालमत्ता आहे.

  • ते महिन्याला भिक्षा मागून ₹६०,०००-७५,००० कमवतात.

  • त्यांच्याकडे दोन फ्लॅट आणि दोन दुकाने असून दरमहा भाडे मिळते.

  • त्यांच्या कथेमुळे सोशल मीडियावर विविध पद्धतीने टीका होत आहे.

देशात गरिबीने भीक मागून खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यातील काही भिकारी हे एखादा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आल्यासारखच भीक मागून आपलं पोट भारतात. मात्र महाराष्ट्रातील मुंबई शहरात एक भिकारी कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. या भिकाऱ्याचं नाव भरत जैन असं असून तो मुंबईतील आलिशान घरात राहतो. या भरतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईतील श्रीमंत भिकारी अशी ओळख असलेल्या भरत याने चार दशकांत भिक्षा मागून आणि हुशारीने गुंतवणुकीद्वारे ₹७.५ कोटींची संपत्ती जमवली. भरत दररोज छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदान सारख्या गर्दीच्या ठिकाणी भिक्षा मागून दरमहा ₹६०,०००-७५,००० कमवत होता. असे असूनही तो सामान्यपणे राहतो आणि दररोज भीक मागून उदरनिर्वाह करतो.

भरतकडे मुंबईतील सुमारे ₹१.४ कोटी किमतीचे दोन फ्लॅट आणि ठाण्यात दोन व्यावसायिक दुकाने आहेत. ज्यातून दरमहा सुमारे ₹३०,००० भाडे मिळते. त्यांची शिस्तबद्ध बचत, वेळेवर मालमत्ता गुंतवणूक आणि चिकाटी यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी बनले आहेत.

या कथेने सोशल मीडियावर विविध पद्धतीच्या टीका होत आहेत. भिक्षा मागण्याच्या नीतिमत्तेवर, आर्थिक साक्षरतेवर आणि शहरी गरिबीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही जण त्यांच्या शिस्तीचे आणि आर्थिक हुशारीचे कौतुक करतात, तर काही जण इतक्या संपत्ती असूनही ते भीक मागत राहतात हे पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. जैन यांचा प्रवास गरिबी आणि यशाबद्दलच्या पारंपारिक कल्पनांना आव्हान देतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: न्याय हक्क मागणे देशद्रोह झालाय; वांगचूक यांच्या अटकेवरून उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल

Minor Heart Attack: मायनर हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे कोणती?

Shivsena Dasra Melava: इस्त्री-व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा नाही; लोकांसाठी संकटात धावणारा एकनाथ शिंदे|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी नेलाय का? एकनाथ शिंंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde : बाळासाहेब असते तर...; दसरा मेळाव्यात शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT