Instagram Ads : तुम्ही काय बोलता हे सर्व इंस्टाग्राम गुपचूप ऐकतं का? अ‍ॅडम मोसेरीने सगळं खरं खरं सांगितलं

Social Media Privacy : इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी. इंस्टाग्राम प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांनी स्पष्ट केले आहे की फोनचा मायक्रोफोन वापरकर्त्यांचे संभाषण ऐकण्यासाठी वापरला जात नाही. मग जाहिराती इतक्या अचूक कशा दिसतात यामागचं खरं कारण जाणून घ्या.
Instagram Ads : तुम्ही काय बोलता हे सर्व इंस्टाग्राम गुपचूप ऐकतं का? अ‍ॅडम मोसेरीने सगळं खरं खरं सांगितलं
Social Media PrivacySaam Tv
Published On
Summary
  • इंस्टाग्राम मायक्रोफोनद्वारे संभाषण ऐकत नाही.

  • जाहिराती अचूक दिसण्यामागे ब्राउझिंग इतिहास आणि तुमच्या आवडीचा संबंध असतो.

  • लोक आधी पाहिलेल्या जाहिराती विसरतात त्यामुळे गैरसमज होतो.

  • मोसेरींनी वापरकर्त्यांच्या शंकेवर अखेर उत्तर दिले.

देशभरात सोशल मीडियाचे करोडो वापरकर्ते आहेत. या वापरकर्त्यांमध्ये इंस्टाग्रामचे अनेक चाहते आहेत. एखाद्या चांगल्या क्षणाचा फोटो टाकण्यापासून ते दुःख शेअर करण्यापर्यंत 'इंस्टाग्राम' वापरकर्त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. मात्र असं असलं तरी इंस्टाग्राम वापरकर्त्यांना नेहमी एक प्रश्न भेडसावतो, तो म्हणजे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी न सांगता सोशल मीडियाला कळतात तरी कशा ? आपलं बोलणं फोन मायक्रोफोनद्वारे ऐकतो का ? वापरकर्त्यांच्या या प्रश्नांवर अखेर इंस्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांनी मौन सोडले आहे.

मोसेरी यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओद्वारे त्यांनी स्पष्ट केले: "आम्ही तुमचे ऐकत नाही. आम्ही तुमचे ऐकण्यासाठी फोनचा मायक्रोफोन वापरत नाही. जर इंस्टाग्राम गुप्तपणे संभाषणे रेकॉर्ड करत असेल तर लोकांना बॅटरी संपणे, मायक्रोफोन वापराचे अलर्ट आणि गोपनीयतेचे उल्लंघन लक्षात येईल." २०१६ पासून मेटाने वारंवार हे स्पष्ट केले आहे, परंतु वापरकर्त्यांमध्ये ही शंका कायम आहे.

Instagram Ads : तुम्ही काय बोलता हे सर्व इंस्टाग्राम गुपचूप ऐकतं का? अ‍ॅडम मोसेरीने सगळं खरं खरं सांगितलं
Dombivli Investment Scam : आकर्षक परताव्याचं आमिष दाखवलं, गुंतवणूकदारांना लुबाडलं, कोट्यवधी रुपयांची फसवणूक

मग इंस्टाग्राम जाहिराती इतक्या अचूक कशा दिसतात?

जाहिराती संभाषणांशी का जोडल्या जाऊ शकतात याची काही कारणे मोसेरीने शेअर केली आहेत ती पुढील प्रमाणे :

  • तुम्ही कदाचित आधी शोधले असेल किंवा क्लिक केले असेल - बऱ्याच वेळा, वापरकर्ते विसरतात की त्यांनी संबंधित लिंकवर क्लिक केले आहे किंवा शॉपिंग साइटला भेट दिली आहे. मेटा जाहिरातदारांसोबत काम करत असल्याने, ब्राउझिंग इतिहास इंस्टाग्रामवरील जाहिरातींवर प्रभाव पाडतो.

  • तुमचे मित्र आणि त्यांच्यासारखेच आवडीनिवडी असलेले लोक कशात गुंतले आहेत याचा अभ्यास इंस्टाग्राम करते. जर तुमचा मित्र एखाद्या उत्पादनाचा शोध घेत असेल तर ते तुमच्या फीडमध्ये देखील आपोआप दिसून येऊ शकते.

  • तुम्ही कदाचित ही जाहिरात आधी पाहिली असेल - कधीकधी, वापरकर्ते जाहिरातींकडे लक्ष न देता खूप लवकर स्क्रोल करतात. नंतर, जेव्हा ते त्याबद्दल बोलतात तेव्हा असे वाटते की चॅटनंतर इंस्टाग्रामने जाहिरात दिली होती, परंतु प्रत्यक्षात ती आधी दाखवली गेली होती.

Instagram Ads : तुम्ही काय बोलता हे सर्व इंस्टाग्राम गुपचूप ऐकतं का? अ‍ॅडम मोसेरीने सगळं खरं खरं सांगितलं
Pune Viral Video : भर रस्त्यात तरूणीला लाथा बुक्क्यांनी मारलं, पुण्यात नेमकं चाललंय काय ? व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

दरम्यान मोसरी यांच्या म्हणण्यानुसार, फोनचा मायक्रोफोन तुमचे संभाषण ऐकत नाही. नेहमीच्या वापरातील काही गोष्टी सतत पाहिल्याने आपल्यावर त्याचा प्रभाव पडतो. शिवाय आपण त्या संबंधित गोष्टींकडे आपोआप आकर्षित होतो. तसेच आजूबाजूची मित्रमंडळी आपल्याला वेगवेगळे विषयांसंबंधित काही न काही पाठवत राहते आणि आपण जेव्हा ते पाहतो तेव्हा ते लगेच न लक्षात येता काही दिवसांनी त्या गोष्टींशी आपलं तारतम्य लागतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com