Mumbai Metro Line 3 work will be Completed By Aug 2025 x
मुंबई/पुणे

Mumbai Aqua Metro : आरे कॉलनीतून थेट CSMT! १७ लाख प्रवाशांसाठी Metro 3 सज्ज; जाणून घ्या तिकीट दर, स्थानकं आणि सर्व माहिती

Mumbai Metro Line 3 work will be Completed By Aug 2025: मुंबई मेट्रो लाईन ३ चा शेवटचा टप्पा ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आरे कॉलनी ते चर्चगेट असा मेट्रोने प्रवास करणे शक्य होणार आहे.

Yash Shirke

Mumbai Aqua Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ ला अ‍ॅक्वा मेट्रो असेही म्हटले जाते. ही मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो आहे. पश्चिम उपनगरे आणि दक्षिण मुंबई यांच्या दरम्यानचा दैनंदिन प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेट्रो लाईन ३ ची उभारणी करण्यात आली आहे. २७ स्थानक, ३३.५ किमी लांबीचा हा मेट्रो कॉरिडॉर उभारण्यासाठी अंदाजे ३७,००० कोटी रुपयांचा खर्च आल्याचे म्हटले जात आहे. ऑगस्ट २०२५ पर्यंत मेट्रो लाईन ३ पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. यामुळे दररोज १७ लाख प्रवाशांना प्रवास करणे शक्य होणार आहे. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल असे म्हटले जात आहे.

सध्या अ‍ॅक्वा मेट्रो लाईन आरे कॉलनी ते कफ परेडपर्यंत पसरलेली आहे. ही मेट्रो लाईन प्रमुख निवासी आणि व्यावसायिक केंद्रांमधून जाते. या मेट्रो लाईनच्या २७ स्थानकांपैकी २६ स्थानके भूमिगत आहेत. आरे कॉलनीमधून मेट्रो लाईनला सुरुवात झाली आहे. अ‍ॅक्वा मेट्रो सेवा जलद गतीने सुरू करण्यासाठी कॉरिडॉरचे उद्घाटन तीन टप्प्यांमध्ये केले जात आहे.

ऑपरेशनल टप्पे आणि टाइमलाइन -

फेज १ - ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरुवात -

आरे कॉलनी ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पर्यंतचा भाग व्यापतो. १३ किमी लांब विभागामध्ये SEEPZ, मरोळ नाका, CSMIA T2 आणि सांताक्रूझ अशा प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.

फेज २ - १० मे २०२५ रोजी सुरुवात -

बीकेसी ते वरळीपर्यंत विस्तार, १० किमी लांब विभाग, दादर, सिद्धीविनायक मंदिर आणि वरळी सारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये मेट्रो लाईनचा विस्तार झाला.

फेज ३ - ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरु होणे अपेक्षित -

मॅजिक ब्रिक्सच्या अहवालानुसार, वरळी ते कफ परेड पर्यंतच्या अंतिम टप्प्यामध्ये महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, चर्चगेट आणि विधानभवन यारख्या दक्षिण मुंबईतील प्रमुख स्थानके सेवेसाठी सुरु होतील.

मुंबई मेट्रो लाईन ३ मध्ये मेट्रो लाईन, उपनगरीय रेल्वे आणि मोनोरेल सिस्टीमला जोडणारे पर्याय उपलब्ध आहेत. उदा. मरोळ नाका मेट्रो लाईन १ ला जोडतो; सीएसएमटी मध्य आणि हार्बर लाईनला जोडतो, चर्चगेट पश्चिम रेल्वे लाईनला जोडतो. तर महालक्ष्मी स्थानकामुळे पश्चिम रेल्वे आणि मुंबई मोनोरेल जोडले जाते. असे पर्याय उपलब्ध असल्याने प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे सहज शक्य होईल.

मुंबई मेट्रो लाईन ३ चे भाडे -

मुंबई मेट्रो लाईन ३ चे भाडे अंतरावर आधारित आहे. प्रवासी तिकीटाची रक्कम १० ते ५० रुपये इतकी आहे.

३ किमी पर्यंत: १० रुपये

३ ते १२ किमी: २० रुपये

१२ ते १८ किमी: ३० रुपये

१८ ते २४ किमी: ४० रुपये

२४ किमीच्या पलीकडे: ५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नाराजी,प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा; जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाबाबत स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Live News Update: करमाळा भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर खुनी हल्ला

Sambhaji Brigade: गायकवाडांवर हल्ला, विधानसभेत पडसाद,हल्लेखोरांचं भाजप कनेक्शन, राऊतांचा आरोप,गायकवाडांवर हल्ला, संभाजी ब्रिगेडही मैदानात

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सब-वे पाण्याखाली; पाहा VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम, विजयी मेळावा फक्त मराठीपुरताच,इगतपुरीच्या शिबिरात ठरणार मनसेची रणनिती

SCROLL FOR NEXT