
इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षाचा आजचा आठवा दिवस आहे. सततच्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती अधिक चिघळली आहे. शुक्रवारी दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले चढवले. इस्त्रायलने इराणच्या अणु पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं. तर इराणच्या तेहरानने क्लस्टर म्युनिशन्ससह क्षेपणास्त्र इस्त्रायलच्या दिशेने डागले. दोन्ही देशांकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणमधील किमान ५ रुग्णालयांचे मोठे नुकसान झालं आहे. तसेच गेल्या सात दिवसांत इस्त्रायली सैन्याने इराणवर केलेल्या हल्ल्यात किमान ६५७ लोकांचा मृत्यू झाला. तर, २,०६७ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकास्थित ह्युमन राईट्स ऑक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांत इस्त्रायली सैन्याने इराणवर केलेल्या हल्ल्यात किमान ६५७ लोकांचा मृत्यू झाला. तर, २,०३७ हून अधिक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. दरम्यान, झांजान प्रांतातील आभार येथे इराणचे दोन जवानही मृत्युमुखी पडले.
गेल्या आठवड्यात इराणमधील पाच रूग्णालयांचे मोठे नुकसान झाले. तसेच जवळच्या भागात इस्त्रायली हवाई हल्ल्यांमुळे रूग्णसेवेवर परिणाम झाला आहे, अशी माहिती इराणच्या सेवा प्रमुखांनी दिली. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, इराण कधीही नागरी क्षेत्रांना विशेषत: रूग्णालयांना लक्ष्य करीत नाही. मात्र, त्यांनी असा आरोप केला की, इस्त्रायलने जाणूनबुजून गाझामधील रुग्णालयांवर हल्ले केले आहेत.
आतंरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं एका पोस्टद्वारे माहिती दिली की, इस्त्रायली हल्ल्यांमध्ये इराणच्या खोंदाब जड पाणी संशोधन स्थळावरील प्रमुख इमारतींचे नुकसान झाले आहे. यात डिस्टिलेशन युनिटही उद्ध्वस्त झालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.