Pune Crime: वाट अडवली अन् कोयत्याने सपासप वार, तिघांकडून तरूणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यावर रक्ताचा पाट

Pune Shocking Crime News: पुण्यात विश्रांतवाडी परिसरात तीन तरुणांनी ४० वर्षीय नरेश तिडंगे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. सीसीटीव्हीत घटना कैद, दोघांना अटक, एक आरोपी फरार.
Pune Crime
Man Attacked with Koyata on Pune Street by Three YouthsSaam TV News
Published On

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र असतानाच, आणखी एका गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तीन तरूणांकडून भररस्त्यावर एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून, हा संपूर्ण हाणामारीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून, या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे.

नरेश रामचंद्र तिडंगे (वय वर्ष ४०) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरेश हे धानोरी रोड विश्रांतवाडी परिसरात काम करतात. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ३ तरूणांनी त्यांची वाट अडवली. त्यांच्या हातात कोयते होते. वाट अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला.

Pune Crime
Solapur: एकाच स्कार्फने दोघांनी आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत नात्याचा उलगडा; सोलापूरात खळबळ

परिसरातील लोकांनी हस्तक्षेप घेतल्यानंतर तिघांनी घटनास्थळावरून पलायन केलं. मात्र या हल्ल्यात नरेश जखमी झाले. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.

Pune Crime
Shocking: शारीरिक संबंध ठेवताना रूमचे पडदे लावायला विसरले; ५ स्टार हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल

याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. हे दोघेही आरोपी विश्रांतवाडी परिसरातील रहिवासी असून, त्यांचा साथीदार फरार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हल्लेखोरांनी पीडित व्यक्तीवर हल्ला का केला? हल्ला करण्यामागचं कारण काय? याचाही तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com