Chhatrapati Shivaji Maharaj International Airport x
मुंबई/पुणे

Mumbai Airport : मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ पाडलं जाणार, पण कधी? कारण काय?

Mumbai Airport Terminal 1 : प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी पुनर्विकासासाठी मुंबई विमानतळ ऑपरेटर टर्मिनल १ पाडणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबई विमानतळ विस्तारानंतर पुनर्विकासाला सुरुवात होईल.

Yash Shirke

  • नवी मुंबई विमानतळाच्या विस्तारानंतर मुंबई विमानतळावरील टर्मिनल १ पाडण्यात येणार असून त्याठिकाणी पुनर्बांधणी होणार आहे.

  • सध्या टर्मिनल १ अंशतः सुरू राहील; ते बंद केल्यास सीएसएमआयएवर मोठी गर्दी होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • नवी मुंबई विमानतळाचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच टर्मिनल १ चे पाडकाम आणि पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु होईल.

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. सीएसएमआयए विमानतळाच्या नूतनीकरणाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. विमानतळातील टर्मिनल १ पाडण्यासाठी सज्ज आहे. टर्मिनल १ पाडण्याला कधी सुरुवात होईल याची माहिती समोर आली आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या विस्तारानंतर मुंबई विमानतळामधील टर्मिनल १ पाडण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासोबत मुंबई विमानतळाचे काम सुरु केले जाईल. सध्या दरवर्षी १ कोटींहून अधिक देशांतर्गत प्रवाशांना सेवा देणारे टर्मिनल १ हे नवी मुंबई विमानतळामधील दुसरे टर्मिनल कार्यान्वित राहील.

मुंबई विमानतळावरील टर्मिनल १ बंद केल्यास मोठी गर्दी निर्माण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. संरचनात्मक आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने टर्मिनल १ मधील काही भाग आधीच कमी केला आहे. नवी मुंबई विमानतळाचे दुसरे टर्मिनल सुरु झाल्यानंतरच टर्मिनल १ पूर्णपणे पाडले जाईल, अशी माहिती कंपनीचे सीईओ अरुण बन्सल यांनी दिली आहे.

नवी मुंबई विमानतळ हे टप्प्याटप्प्याने बांधले जात आहे. पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना सेवा दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात क्षमता वाढवून ५० दशलक्षांपर्यंत नेण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यानंतर मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद केले जाईल आणि त्याठिकाणी पुनर्विकासाला सुरुवात होईल. त्याच जागेवर टर्मिनल १ नव्याने उभारले जाईल. पण या कामाला थोडा वेळ लागू शकतो, असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Accident : गंगेत स्नान करून येताना काळाचा घाला, ६ जणांचा जागीच मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

मराठा आरक्षणाचा फटका EWS प्रवर्गाला! प्रवेशात तब्बल १५ टक्क्यांची घट|VIDEO

Pune Tourism : पुण्यातील 'हे' जुळे किल्ले कधी पाहिलं आहात का? पर्यटकांचे प्रमुख आकर्षण

SCROLL FOR NEXT