mumbai airport  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर विमानाला भरधाव वाहनाची धडक; प्रवाशांमध्ये एकच खळबळ

Mumbai Airport update : मुंबई विमानतळावर विमानाला भरधाव वाहनाची धडक झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

Vishal Gangurde

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी मोठी दुर्घटना टळली. अकासा एअरलाइन्सचं विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना कार्गो कंटनेर वाहनाने विमानाच्या पंख्याला धडक दिली. या घटनेत विमानांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे विमानातील प्रवाशांना तातडीने पर्यायी विमानाची सोय करण्यात आली.

विमानतळावर सकाळी ४.५४ वाजता ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. एकासा एअरलाइन्सचं विमान QP1736 बेळंळुरूहून मुंबईत आल्यानंतर पार्क करण्यात आलं होतं. त्यानंतर हेच विमान QP1410 पुढे मुंबईहून दिल्लीला रवाना होणार होतं. विमानात प्रवाशांच्या बोर्डिंगपूर्वी कार्गो उतरवण्याचे काम सुरू होतं. त्याचवेळी कंटेनर वाहनाने विमानाच्या उजव्या पंख्याला धडक दिली. या अपघातात विमान आणि कंटेनर वाहनाचंही नुकसान झालं.

धडक दिल्यानंतर विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. त्यानंतर या विमानाला 'एअरक्राफ्ट ऑन ग्राऊंड' घोषित करण्यात आलं. त्यानंतर अकासा एअरलाइन्सने नवी विमान प्रवाशांसाठी तयार केलं. त्यानंतर इतर बसच्या माध्यमातून पर्यायी विमानाजवळ सोडण्यात आलं.

मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे. परंतु सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रवाशांना अकासा एअरलाइन्सने पर्यायी विमानाची तातडीने सोय केली. या प्रकरणाची पुढील तपास सुरु करण्यात आलं आहे.

दरम्यान, मागील महिन्यात १२ जून रोजी गुजरातच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं टेकऑफ करताच दुर्घटना घडली. या दुर्घटनेत २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. विमानातील १२ क्रू मेंबरचाही मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत एकच प्रवासी जिवंत वाचला होता. तर या घटनेत मेडिकल कॉलेजच्या २९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात रस्त्यावरील इतर लोकांची मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT