Mumbai Airport Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Airport Accident : आलिशान गाडीचा मुंबई विमानतळावर अपघात; २ परदेशी नागरिक अन् ३ कर्मचारी जखमी

Mumbai Airport News : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या टर्मिनस २ येथे मर्सिडीज-बेंझ कारचा अपघात झाला. चालकाचे गाडीवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असे म्हटले जात आहे.

Yash Shirke

Mumbai Airport News : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका मर्सिडीज-बेंझ कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन परदेशी नागरिकांसह पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान कार चालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा ते तपास करत आहेत.

मुंबई विमानतळाच्या टर्मिनस २ च्या परिसरात अपघात घडला. आरोपी कारचालकाने एकाला गेट क्रमांक १ वर सोडले होते. त्यानंतर परत जाताना त्याचे मर्सिडीज कारवरचे नियंत्रण सुटले आणि ती कार गेट ३ समोरच्या उतारावर आदळली. या अपघातात दोन परदेशी प्रवासी जखमी झाले. ते दोन्ही प्रवासी झेक रिपब्लिकचे असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामध्ये विमानतळावरचे ३ कर्मचारी देखील जखमी झाले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जनसंपर्क विभागाने या अपघातासंबंधित माहिती जाहीर केली आहे. 'टी २ च्या डिपार्चर लेनमध्ये चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ५ जण जखमी झाले. विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने तातडीने प्राथमिक उपचार करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. पुढे लगेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले', असे स्पष्टीकरण विमानतळाच्या जनसंपर्क विभागाने दिले.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस १ चा पुनर्विकास केला जाणार आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये विमानतळाचा हा भाग पाडून त्याचा कायापालट करण्याचा निर्धार आहे. हे काम २०२८-२०२९ मध्ये पूर्ण होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक लाभदायक व्हावा यासाठी विमानतळाच्या टर्मिनस १ वर अत्याधुनिक सुविधांचा समावेश केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT