Sachin Tendulkar : "मी पण थोडासा पुणेकर..." मुलाखतीत सचिन तेंडुलकरने सांगितलं पुण्याशी कनेक्शन

Sachin Tendulkar At Pune : पुण्यातील प्रतिष्ठित चितळे बंधू समूहाला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात सचिन तेंडुलकरने हजेरी लावली होती.
Sachin Tendulkar At Pune
Sachin Tendulkar At PuneChitale group fb page
Published On

Sachin Tendulkar : पुण्यातील सुप्रसिद्ध चितळे उद्योग समूहाला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. समूहाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यात कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला भारतरत्न सचिन तेंडुलकरने उपस्थिती राहिली आहे. चितळे समूहाचा सचिन तेंडुलकर ब्रँड अँबेसिडर देखील आहे. या कार्यक्रमामध्ये सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकरसोबत गप्पा मारल्या.

गप्पा सुरु करताना सुनंदन लेले म्हणाले, 'सचिन पुण्यात खूप वर्षांनंतर तू आला आहेस. काल बीसीसीआयचा भव्य सोहळा झाला. त्यात सचिनला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चितळे परिवार, एकत्र कुटुंबपद्धती, आपली फॅमिली याचं महत्त्व तुलाही जाणवलं असेल ना..' त्यावर सचिन म्हणाला, 'माझी फॅमिली इथे आहे. माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि ती पुण्यात राहायला लागली. तर कुठे ना कुठे मी म्हणेन मी पण थोडासा पुणेकर आहे.'

सचिन पुढे म्हणाला, 'माझं मुंबईसाठी ज्यूनियर लेव्हलला करिअर सुरु झालं ते पुण्यात सुरु झालं. मी पुण्यात १९८५ च्या आसपास आलो होतो. पुण्यात डेक्कन, पीवायसीआला आलो होतो. तेव्हापासून पुण्याशी संबंध होता. फॅमिलीबद्दल बोलायचं तर आपली फॅमिली आपली ताकद आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की मी माझ्या कुटुंबात जन्माला आलो. अडचणीच्या काळात तुमचं कुटुंब तुमच्या सोबत असतं. माझं एक कुटुंब घरी होतं, एक कुटुंब ड्रेसिंग रुममध्ये होतं.. तर मोठं कुटुंब आपल्या भारत देशाचं..'

Sachin Tendulkar At Pune
Lifetime Achievement Award : क्रिकेटच्या देवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; क्रीडा क्षेत्रातील मिळाला मोठा पुरस्कार

सुनंदन लेले म्हणाले, तू कधीही शॉर्टकट्स घेतले नाहीस. त्यावर सचिन म्हणाला, मला लहानपणापासून बाबांना सांगितलं होतं मी एकवेळ अपयश मान्य करेन पण शॉर्टकट्स सहन करणार नाही. अपयशी होणं गैर नाही. ज्यावेळेस घरुनच असे धडे मिळतात तेव्हा तुम्हाला अपयशाची भीती वाटत नाही. आचरेकर सर मला पॅड आणि बॅट हातात घेऊन शिवाजी पार्क मैदानाला 2 राऊंड मारायला लावायचं. आचरेकर सरांनी मला शॉर्ट कट घ्यायचा नाही हे शिकवले.

सुनंदन लेले यांनी लोकांच्या अपेक्षांवर एक प्रश्न विचारला. त्यावर सचिन म्हणाला, 'लोकांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत. हे तुम्हांला कळलं पाहीजे. अपेक्षाचं ओझं डोक्यावर असल पाहिजे मागे नाही. लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत म्हणजे मी योग्य फिल्डमध्ये आहे. मला आवडत होते प्रेशरमध्ये राहायला.'

Sachin Tendulkar At Pune
IND vs ENG T20 Series: टीम इंडियाचे तीन खेळाडूंच्या पटकावू शकतात 'प्लेअर ऑफ द सीरीज'चा पुरस्कार

सुनंदन लेले यांनी 'जीवनात कोणतरी कान पकडणाऱ्या व्यक्तीच महत्व ?' असा प्रश्न विचारला. त्यावर सचिन म्हणाला, 'मी एकदा रन आउट होऊन मैदानावर चिडलो होतो. त्या त्यानंतर माझ्या भावाने मला सांगितलं तू चिडल्याने काही फायदा झाला नाही. तू खेळत असलेल्या व्यक्ती ला डिस्टर्ब करून आलास' अशी प्रतिक्रिया दिली.

Sachin Tendulkar At Pune
BCCI Awards: जसप्रीत बुमराहने तिसऱ्यांदा पटकावला हा मोठा पुरस्कार! स्मृती मंधानाचाही BCCI कडून गौरव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com