
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत होता, तेव्हा बुमराहने शानदार गोलंदाजी करुन संघाला अडचणीतून बाहेर काढलं. २०२३-२४ वर्षांत त्याच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला.
या कामगिरीची दखल घेत बुमराहची बीसीसीआयकडून दिल्या जाणाऱ्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर भारतीय संघातून स्मृती मंधानाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
बुमराहने गेल्या वर्षात शानदार गोलंदाजी केल. इंग्लंड आणि बांगलादेशला मायदेशात खेळताना हरवण्यात बुमराहने मोलाचं योगदान दिलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही बुमराहच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली.
या मालिकेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. यासह त्याची मालिकावीर म्हणून देखील निवड करण्यात आली होती. इतकेच नव्हे, तर बुमराहने केलेल्या या शानदार कामगिरीची दखल आयसीसीनेही घेतली. बुमराहची आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर आणि आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून देखील निवड करण्यात आली होती.
जसप्रीत बुमराह पुरुषांमध्ये क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरी ठरला. तर महिलांमध्ये भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने या पुरस्कारावर नाव कोरलं. मंधानाने फलंदाजीत आपली छाप सोडत २०२४ मध्ये ७४३ धावा चोपल्या. यादरम्यान तिने एकाच वर्षात सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला. गेल्या वर्षी फलंदाजी करताना तिने ९५ चौकार आणि ६ षटकार खेचले.
स्मृती मंधानाने पहिल्यांदाच या पुरस्कारावर नाव कोरलं होतं. तर जसप्रीत बुमराहने तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. बुमराहने यापूर्वी २०१८-१९, २०२१-२२ मध्ये या पुरस्कारावर नाव कोरलं होतं. तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पाच वेळेस या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. यासह आर अश्विन आणि सचिन तेंडुलकरने प्रत्येकी २-२ वेळेस, तर शुभमन गिलने १ वेळेस या पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.