Air Pollution Mumbai  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Air Pollution : मुंबईकरांचा श्वास कोंडला! आरोग्याच्या समस्या वाढल्या, BMC कडून गाईडलाइन्स जारी

BMC Guidelines For Air Pollution: मुंबई महानगर पालिकेने हवेच्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी त्वरित आणि कठोर उपाययोजना करण्यासाठी काही गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करावेच लागेल.

Priya More

मुंबईमधील हवा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. हे हवेचे प्रदूषण सध्या गंभीर बाब बनली आहे. वातावरणातील बदलांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रदूषणात वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगर पालिकेने हवेच्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी त्वरित आणि कठोर उपाययोजना करण्यासाठी काही गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाइन्सचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गाईडलाइन्स आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बांधकामांशी संबंधित बाबींचा देखील समावेश आहे. आता महानगरपालिका प्रशासनाने त्यापुढे जाऊन वायू प्रदुषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या छोट्यामोठ्या घटकांवरही अधिक लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, बांधकामाच्या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यासाठी लाकूड आणि तत्सम बाबी इंधन म्हणून जाळणे तसेच शेकोटी पेटवणे यासारखे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरुन वायू प्रदूषण होणार नाही.

रस्त्यालगत सुरू असलेल्या बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ जी प्रामुख्याने प्रदूषणास कारणीभूत ठरते, ती नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तात्काळ आणि कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व सहाय्यक अभियंते आणि सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक यांनी या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे तसेच त्वरित उपाययोजना कराव्यात, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

महापालिकेकडून देण्यात आलेल्या गाईडलाइन्स -

- प्रमुख आणि छोट्या रस्त्यांवरील स्वच्छता व धूळ प्रतिबंधासाठी संयंत्रांचा प्रभावीपणे वापर करावा.

- वर्दळीच्या रस्त्यांवर नियमितपणे पाण्याची फवारणी करावी.

- रस्त्यांचे व रस्त्यालगत सुरु असलेल्या बांधकामाचे नियमितपणे परीक्षण करावे.

- उपद्रव शोध पथक, क्लीनअप मार्शल यांच्यामार्फत संबंधितांना सक्त सूचना देण्यात याव्यात. रस्त्यावरील धूळ, राडारोडा व कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.

- खुल्या जागेत किंवा मोकळ्या जागेत बांधकामाच्या साहित्यावर नियमितपणे पाणी फवारणी करावी.

- 'डेब्रिस ऑन कॉल' सेवेचे सक्षमीकरण व प्रभावीपणे वापर करण्यासाठी राडारोडा संकलन आणि त्याची विल्हेवाट प्रभावीपणे व वेळेत करावी.

- बांधकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी.

- बांधकाम साहित्याचे वहन करणाऱ्या वाहनांकडे वैध परवाना जमा असल्याची खातरजमा करावी.

- विनापरवाना अथवा बेकायदेशीर राडारोडा वाहतूक करणाऱ्या, तसेच वाहनावर आच्छादन न टाकता सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करावी.

- उपद्रव शोध पथक आणि क्लीनअप मार्शल्स यांच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत कचरा जाळण्यास प्रतिबंध करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

SCROLL FOR NEXT