Bullet Train Update Saam Tv
मुंबई/पुणे

Bullet Train: बुलेट ट्रेनबाबत खुशखबर! रेल्वेमंत्र्यांनी व्हिडिओ शेअर करत दिली मोठी बातमी

Mumbai-Ahmedabad Bullet train: मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनबाबत मोठी माहिती समोर आली आहे. बुलेट ट्रेनसाठी देशातील पहिली बॅलास्टलेस ट्रॅक सिस्टिम तयार करण्यात येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai-Ahmedabad Bullet train:

मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनबाबत मोठी माहिती समोर आली आहे. बुलेट ट्रेनसाठी देशातील पहिली बॅलास्टलेस ट्रॅक सिस्टिम तयार करण्यात येत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर या प्रकल्पाबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच याच्या कामाविषयी माहिती दिली आहे.

अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे की, 295.5 किमीपर्यंतच्या घाटाचे काम पूर्ण झाले. तसेच 153 किमी वायडक्टचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. याशिवाय मोदी 3.0 मध्ये अजून बरेच काही होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर बुलेट ट्रेनसाठी एक विशेष ट्रॅक सिस्टम तयार करण्यात येत आहे, जी गिट्टीमुक्त असेल. ही जे-स्लॅब बॅलास्टलेस ट्रॅक सिस्टीम आहे. या ट्रॅक सिस्टीममध्ये प्रामुख्याने 4 भाग आहेत. आरसी ट्रॅक बेड, सिमेंट मोर्टार, प्रीकास्ट ट्रॅक स्लॅब आणि रेल विद फास्टनर्स. (Latest Marathi News)

देशातील दोन शहरांमध्ये प्री-कास्ट आरसी ट्रॅक स्लॅब तयार केले जात आहेत. गुजरातच्या आनंद आणि किममध्ये हे काम सुरू आहे. ट्रॅक बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे.

दरम्यान, जोरदार वारा किंवा वादळामुळे या हायस्पीड ट्रेनचे नुकसान होऊ नये यासाठी विशेष पावले उचलली जात आहेत. यासाठी 508 किलोमीटरच्या मार्गावर 14 ठिकाणी वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी Anemometer बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर देशाच्या पश्चिम भागातील किनारी भागातून जाणार आहे. जेथे वाऱ्याचा वेग जास्त असतो. या जोरदार वाऱ्यांमुळे पुलावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे येथे Anemometer बसवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe : भाजणी नीट जमत नाही? मग पोह्यांपासून बनवा अवघ्या १० मिनिटांत कुरकुरीत चकली

'Bigg Boss 19' च्या घरात तान्या मित्तल ढसाढसा रडली, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : 'सिरप' प्रवर्गातील औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन- चिट्ठी शिवाय विक्री करू नये

Urban Land Fragmentation: शहरातील प्लॉटधारकांना सरकारचा मोठा दिलासा, जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द, वाचा काय घेतला निर्णय

ITR Refund: ITR रिफंड प्रोसेस दिसतंय पण पैसे मिळाले नाही? काय करावे? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT