Manasvi Choudhary
अनेक पदार्थ्यांमध्ये लिंबाचा वापर केला जातो. लिंबू जेवणाची चव वाढवतो. बाजारातून आणलेले लिंबू आठवडाभर ताजे आणि टवटवीत राहण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करा.
लिंबू गॅस, स्टोव्ह अश्या उष्ण तापमानाच्या ठिकाणी ठेवणे टाळा. लिंबू कोरड्या जागी ठेवावेत.
घट्ट प्लास्टिकच्या पिशवीत ठेवणे टाळावे. प्लास्टिकच्या टोपलीमध्ये लिंबू साठवून ठेवल्याने अधिक काळ टिकतील आणि ताजे राहतील.
फ्रिजमध्ये थंड तापमानात लिंबू ठेवले तर त्यातील ओलावा कमी होतो आणि नैसर्गिकरित्या पिकण्याची प्रक्रिया मंदावते.
लिंबू साठवताना हवा बंद डब्यात किंवा भांड्यात ठेवणे टाळावे. त्याऐवजी तुम्ही हवा खेळतील राहील अश्या ठिकाणी ठेवा.
लिंबू फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी व्यवस्थित धुतली असतील तर ती कोरडे करा आणि मगच ठेवा नाहीत लिंबूतील आर्द्रता कमी होईल.
कापलेल्या किंवा अख्या लिंबूवर तुम्ही हलकासा मीठ लावल्यास लिंबू अधिक काळ टिकू शकतात. मीठ ओलावा शोषून घेते याशिवाय लिंबावर जर जिवाणू आणि बुरशीची वाढ रोखण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.