Dombivli Travel : फार दूर जाण्याची गरज नाही! डोंबिवलीपासून जवळच आहेत 'हे' ६ भन्नाट विकेंड डेस्टिनेशन्स

Shreya Maskar

डोंबिवली

डोंबिवलीमध्ये राहत असाल आणि वीकेंडला फिरण्यासाठी जवळची ठिकाणे शोधत असाल, तर कल्याण, भिवंडी आणि आसपासच्या परिसरातील ऐतिहासिक स्थळे, टेकड्या आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता.

Dombivli | pinterest

दुर्गाडी किल्ला

डोंबिवलीपासून जवळ कल्याण येथे दुर्गाडी किल्ला आहे. किल्ल्याच्या परिसरात दुर्गादेवीचे मंदिर आहे. येथून कल्याण खाडी आणि आसपासच्या परिसराचे दृश्य पाहता येते.

Durgadi Fort | pinterest

काळा तलाव

बेतूरकर पाडा, कल्याण पश्चिम येथे काळा तलाव हे पर्यटन स्थळ आहे. तलावाच्या परिसरात फिरण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी जागा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी फेरफटका मारता येतो.

Kala Talav | pinterest

लोनाड लेणी

लोनाड गाव, भिवंडी तालुक्यात लोनाड लेणी आहेत. येथे प्राचीन लेणी आणि ऐतिहासिक सूर्य मंदिर पाहता येते. या परिसरात जुन्या स्थापत्यकलेचे अवशेष आढळतात.

Lonad Caves | pinterest

भोपार टेकडी

भोपार गाव, डोंबिवली पूर्व येथे भोपार टेकडी आहे. डोंबिवली आणि आसपासच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. टेकडीवर मंदिर असून तिथपर्यंत चालत जावे लागते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथे छान वातावरण अनुभवता येते.

Bhopar Hill | pinterest

उंबार्ली टेकडी

डोंबिवलीच्या बाहेरील उंबार्ली परिसरात उंबार्ली टेकडी आहे. हिरवळ आणि नैसर्गिक वातावरणामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आकर्षक आहे. येथे पक्षी निरीक्षण आणि हलका फेरफटका मारता येतो. सकाळच्या वेळी भेट दिल्यास पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळू शकते.

Umbarli Hill | pinterest

कोणती काळजी घ्यावी?

पिण्याचे पाणी आणि आवश्यक खाद्यपदार्थ सोबत ठेवा. लेणी आणि ऐतिहासिक वास्तूंना भेट देताना स्वच्छता राखा. डोंगराळ किंवा निर्जन परिसरात शक्यतो समूहाने जा. जाण्यापूर्वी स्थानिक मार्ग, प्रवेशाची वेळ आणि उपलब्ध सुविधांची खात्री करा.

Precautions to Take | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : लोणावळा-माथेरान विसरा! हिवाळ्यात मुंबईजवळील 'या' ६ निसर्गरम्य ठिकाणी प्लान करा वीकेंड पिकनिक

Mumbai | AI PHOTO
येथे क्लिक करा...