Mumbai : लोणावळा-माथेरान विसरा! हिवाळ्यात मुंबईजवळील 'या' ६ निसर्गरम्य ठिकाणी प्लान करा वीकेंड पिकनिक

Shreya Maskar

मुंबईची थंडी

यंदाच्या हिवाळ्यात नेहमीच्या लोणावळा, माथेरान आणि अलिबागपेक्षा काही वेगळ्या ठिकाणी फिरण्याचा विचार करत असाल, तर ही ६ ठिकाणे नक्की पाहा.

Winter in Mumbai | pinterest

येऊर हिल्स

येऊर हिल्स परिसरात घनदाट जंगल, डोंगररांगा आणि शांत वातावरण अनुभवता येते. शहरापासून जवळ असल्याने अर्ध्या दिवसाच्या सहलीसाठी हा चांगला पर्याय आहे. हिवाळ्यात येथे निसर्गभ्रमंतीचा आनंद घेता येतो.

Yeoor Hills | pinterest

मनोरी बीच

मुंबईजवळील समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ घालवायचा असेल तर मनोरी बीचला भेट द्या. नारळाची झाडे, समुद्राची हवा आणि सुंदर सूर्यास्त यामुळे येथे पिकनिकचा आनंद घेता येतो.

Manori Beach | pinterest

पवना तलाव

पवना तलाव परिसरात डोंगर, विस्तीर्ण पाणीसाठा आणि सुंदर सूर्यास्त पाहायला मिळतो. तलावाच्या परिसरातून तुंग, तिकोना आणि लोहगड या किल्ल्यांचे दर्शन होते. कॅम्पिंग आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे.

Pawna Lake | pinterest

कामशेत

डोंगरदऱ्या, तलाव आणि निसर्गरम्य परिसरामुळे कामशेत हे हिवाळी सहलीसाठी सुंदर ठिकाण आहे. पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठीही हा परिसर प्रसिद्ध आहे.

Kamshet | pinterest

जव्हार

मुंबईपासून थोडे लांब असले तरी जव्हार हे हिवाळ्यात फिरण्यासाठी सुंदर ठिकाण आहे. डोंगरदऱ्या, हिरवळ, आदिवासी संस्कृती आणि ऐतिहासिक जयविलास पॅलेस यामुळे येथे एक ते दोन दिवसांची ट्रिप प्लान करता येते.

Jawhar | pinterest

मोरबे धरण

शांत पाणवठा, डोंगर आणि मोकळा परिसर अनुभवण्यासाठी छोटा मोरबे धरण परिसर चांगला पर्याय आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर काही वेळ शांत बसण्यासाठी हे ठिकाण निवडता येते. शेवटच्या टप्प्यातील रस्ता खराब असू शकतो आणि येथे सुविधा मर्यादित आहेत.

Morbe Dam | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : थंडीच्या दिवसांत कुटुंबासोबत फिरण्यासाठी नाशिकमधील ५ सुंदर ठिकाणे, कमी बजेटमध्ये प्लान होईल ट्रिप

Nashik Picnic | AI PHOTO
येथे क्लिक करा...